काठमांडू येथे जागतिक बौध्द परिषद महेंद्र यांच्या अध्यक्षतेखाली. तेथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दि . २० नोव्हेंबर १९५६ ला बुद्ध आणि कार्ल मार्क्स या विषयावर केलेल्या भाषणाचे काही मुद्द्यांचा मुक्त अनुवाद खाली मांडत आहे.
आज या सभेत बौद्ध धम्म व साम्य वाद या विषयावर मी बोलावे असे परिषदेला उपस्थित आसलेल्या बहुसंख्यांक लोकांना वाटत असल्याचे मला सांगण्यात आले . हा विषय आकस्मिक पणे माझ्यावर सोपविला गेला असल्याने एवढ्या महान व विस्तृत विषयावर बोलण्याची माझी तयारी झालेली नाही. हा विषय केवळ महान व विस्तृत च नाही तर अत्यंत भारदस्त आहे. ह्या भारदस्त विषयाच्या दडपणाखाली अर्धे अधिक जग सापडलेले आहे , एवढेच नव्हे तर बौद्ध राष्ट्रातील तरुण विद्यार्थी वर्ग सुद्धा ह्या विषयाच्या मगरमिठीत सापडलेला आहे. हि दुसरी बाब मला अत्यंत चिंताजनक वाटते.
साम्यवाद हि जीवनप्रणाली त्या जीवनप्रणाली पेक्षा बौद्ध धम्माने सांगितलेली जीवनप्रणाली उत्कृष्ट व सरस आहे , अशी प्रसंसा जोपर्यंत बौद्ध राष्ट्रातील तरुण करत नाही तोपर्यंत बौद्ध धर्माचे भविष्य उज्वल आहे असे म्हणता येणार नाही . बौद्ध धर्मावरील श्रद्धा दोन पिढ्याही तग धरू शकणार नाही . यास्तव बौद्ध धम्मावर ज्यांची दृढ श्रद्धा आहे अशा लोकांनी तरुण पिढीस बौद्ध धर्माची महत्ता पटवून देऊन साम्यवादाला बौद्ध धर्मच पर्याय आहे. किंबहुना बौद्ध धर्मच सर्वोत्तम जीवन मार्ग आहे असे सांगणे अत्यंत आवश्यक आहे. हि गोष्ट पटवून दिल्यावरच बौद्ध धर्म टिकवून धरण्याची अशा बाळगता येऊ शकते . आपण हेही तेवढेच ध्यानात घेतले पाहिजे कि युरोपमधील बहुसंख्यांक लोक व आशियामधील बहुसंख्यांक तरुण असा दृष्टीकोन बाळगतात कि, आजच्या जगात कार्ल मार्क्स हाच केवळ पूज्यनीय महापुरुष किंवा प्रेषित आहे. त्याचबरोबर ते असाही विचार प्रदर्शित करतात कि, बौद्ध भिक्खू संघातील फार मोठा भाग केवळ निरुपयोगीच नव्हे तर एक मोठे पिवळे संकट आहे . अशा प्रकारची विचारसरणी कशाचे द्योतक आहे हे भिक्खूंनी लक्षात घेतले पाहिजे आणि कार्ल मार्क्स शी तुलना केली जाऊ शकेल अशा प्रकारे स्वतःला घडवून घेण्याची त्यांची पराकाष्टा करावयास पाहिजे . तेव्हाच बौद्ध धर्माचे श्रेष्ठत्व शाबित केले जाऊ शकेल .
साम्यवादाची उपाययोजना संबंधाची विचारसरणी जुलुम जबरदस्तीवर आधारलेली आहे. कल्पना करा उद्या रशियातील साम्यवादी हुकुमशाही बारगळली किंवा तशी चिन्हे दिसू लागली तर काय होईल ? साम्यवादाची अवस्था कशी होईल ? हे जाणून घेण्यासाठी मी निश्चितच उत्सुक राहीन. माझ्या कल्पनेप्रमाणे राज्याच्या मालकीची मालमत्ता बळकावण्यास रशियन लोक परस्परात रक्तपात घडवून आणतील आपापसात लढाया करतील हि परिणीती अपरिहार्य अशीच राहील. कारण रशियातील लोकांनी साम्यवादी विचारसरणी सहजासहजी स्वीकारलेली नाही. आपणहून ती त्यांनी मान्य केलेली नाही ती त्यांच्यावर जबरदस्तीने लादली गेलेली आहे. साम्यवाद प्रस्थापित करताना त्यांना हि भीती घातली गेली कि, त्यांनी जर साम्यवादी विचार प्रणाली मानली नाही तर त्यांना फासावर लटकावले जाईल आणि त्यामुळेच ते अजून ती निमुटपणे पाळीत आहेत. हे लक्षात ठेवले पाहिजे कि, भयापोटी कोणतीच विचारप्रणालीचे मूळ तग धरू शकत नाही. एखादी विचार प्रणाली ग्रहण केली, परंतु कालांतराने तिची धारणा नष्ट झाली तर त्या विचारप्रणालीचे पुढे काय होईल , या प्रश्नाचे उत्तर जोपर्यंत देता येणार नाही, तोपर्यंत ती बिम्बिवण्यात काहीच अर्थ नाही. कारण मनोभूमिका तयार केली नसेल तर सत्याची नेहमीच जरुरी भासेल याच कारणास्तव मला बुद्धांचे नेहमी आकर्षण वाटते. बुद्धाची विचारसरणी हि लोकशाही ची विचारसरणी आहे .
अजातशत्रू ला वाज्जींना जिंकवायचे होते. हे सांगण्यासाठी अजातशत्रू चा सेनापती बुद्धाकडे आला. बुद्ध त्याला म्हणाला कि राजा वज्जींचा पराभव करू शकणार नाही . कारण वज्जी जोपर्यंत आपल्या जुन्या पद्धतीला धरून राज्यशासन चालवत आहे तोपर्यंत त्याचा पराभव होणे शक्य नाही. इथे वज्जींची जुनी पद्धत म्हणजे लोकशाही पद्धत होय . यावरून बुद्ध हा लोकशाहीचा मोठा पुरस्कर्ता होता हे स्पष्ट होते.
साम्यवादाच्या विजयदुदुम्भीने बावरून जाऊ नका किंवा भुलून जाऊ नका किंवा दिपुनही जाऊ नका. तुम्ही जर बौद्ध विचारसरणीचा व तत्वज्ञानाचा एक दशांस भाग जरी आत्मसात करू शकलात तर साम्यवाद जे काही निर्माण करू इच्छितो, ते तुम्ही करुणा , न्याय व सद्भावना ह्यांच्या जोरावर घडवून आणू शकाल यात तिळमात्र शंका नाही .
बाबासाहेबंच्या काही मोजक्या मुद्यांची मी इथे मांडणी केली आहे शब्द मर्यादेमुळे पूर्ण भाषण इथे विवेचीत करणे कठीण आहे .आपण पूर्ण भाषण इंटरनेट द्वारे मिळवू शकता .
अहमद शेख -९६९९९३६५७५

No comments:
Post a Comment