जन्म मरण नको आता, नको येरझार…
व्वा ! काय अभंग आहे, आणि काय मधुर आवाज आहे जीतेन्द्रजी अभिषेकी यांचा, दिवसभर कानात घुमत राहतो, कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर म्हणत,थेट पांडुरंगाला चंद्र होण्याची विनंती करताना अभिषेकी यांनी हृदयाच्या ज्या खोल आत्मीयतेने पांडुरंगाला हि विनंती केली, तितक्याच खोलीने त्यांनी जन्म मरणा विषयी आळवणी केली असेल का ?? असेल.
आज सकाळी सकाळी काय लिहावं याचा विचार करीत असताना मित्राच्या मोबाईल वरती हे सुरेख गीत सुरु होते, गीताचं दुसरं कडवं सुरु झालं आणि माझ्या नजरेसमोरून त्या सर्व घटना चीत्राफितीसारख्या नजरेसमोरून फिरू लागल्या. मन फार अस्वस्थ झालं, पण करणार काय? वाटलं या विषयावर आपण काहीतरी लिहू शकतो. आणि फक्त लिहूच शकतो. देवानेही बोरू देवून पाठवले आणि आम्हीपण त्याचा उपयोग करताना कुठे नाही कमी पडणार . असो माझ्या प्रस्तावनेतून नक्कीच विषयाचा बोध होत नसेल, नाहीच होणार कारण जे विषय सर्वांसमक्ष घडले,घडतायत ते लोकांना या पुरोगामी महाराष्ट्राला समजले नाहीत, दिवसरात्र सोसीअल मिडीयावर नको त्या विषयाचा उहापोह करणाऱ्या महानुभवांना समजले नाही. माझी नवख्याची प्रस्तावना ती काय समजणार…?
गावातल्या प्रतिष्ठित घरातल्या पण आपल्याच वर्गातल्या मुलीवर प्रेम केलं, वय पण कमी, अल्लड पणा करण्याच, मस्ती करण्याच पोरींकडे बघत-बघत काहीतरी विनोद करण्याचं,पण ११ वी मधल्या या वेड्याला त्याच्या जातीनं आणि गावाच्या प्रतीष्ठेने,गावाच्याच शिवारावर गळ्यात फास घालून लटकावला. जीव गेला पण अनेक यातना त्या शरीरानं सोसल्या, त्या असह्य झाल्या आणि त्याने प्राण सोडला. किती सहज वाचतो न आपण या गोष्टी. अख्या घराचा नायनाट केला, कालपर्यंत ज्या घरात सकाळ-सकाळी अगदी पहाटे किलबिलाट असायचा, दिवस उजाडताना त्या तांबड्या रंग छटासोबत चुलीतला धूर कसा एकजीव व्हायचा, घरात कशी लगबग असायची, आणि … आणि आज कोणीच नाही हो घरात, एकदम स्मशान शांतता का हो ?? अहो घरात नका जाऊ त्या भिंती घाबरल्यायत, घराचे वासे पण रडतायत, घरातली सारवलेली धरणीमाय पण कोमेजली, ती आतल्या आताच रडतेय, तिच्या कुशीत झोपायला, बागडायला कुणीच शिल्लक नाही राहिलं …
ते छिन्न -विच्छिन्न झाले, त्यांच्या देहाचे तुकडे साऱ्या शिवारात पसरले, कोण म्हणून तुम्हाला भेटणार, थोरल्याचं धड कोरड्या विहिरीत आणि डोकं माहित नाही. अहो असेल इकडेच कुठेतरी…
काल पर्यंत ज्या माणसाला शोधत असतील आज त्या माणसाच्या शरीराचे तुकडे शोधण्याची वेळ !!!
बाकीच्यांचे माहित नाही किती तुकडे झाले आणि कुठे गेले ? त्यांची जात आडवी आली कि प्रतिष्ठा, काहीही असो पण इतकी क्रूरता का ठासून भरली जाते एखाद्या विशिष्ट जातीच्या, धर्माच्या विरोधात ?
एक किस्सा आठवला गावाकडचा- पाटलांच्या शेतात काहीतरी चोरी झालं आणि नाव आलं लक्ष्मण वर लक्ष्मण ची जात हरिजन. गावाच्या वेशीत मारुतीच्या मंदिरासमोर पाटलांनी त्याला बोलवलं आणि त्याला त्याविषयात दरडावून विचारलं. लक्ष्मण बोलला " मारुतीची शपथ आण्णा, म्या काय नाय केलं ?" तसा पटलंच राग अनावर झाला, त्याच्या जाळीच्या बनियन ला पकडत पाटील बोलले " मायघाल्या, मारुतीची शपथ घेतूस व्हय रं आर तुझी यमाई बसलीय कि गावच्या बाहीर तिची शपथ व्हाय नां "
कधी संपणार हा वनवास, कधी मोडणार या बेड्या ज्या मध्ये आम्ही जखडलोय वर्षानुवर्षे, कधी मुक्त होणार जातीपातीची बंधन, जातीच्या नावानं दिली जाणारी आरक्षणं, आश्वासनं…
ह्यांच्या मुक्ततेचं माहित नाही पण अनेक जीव अतिशय क्रूरपणे मरत आले, नरक यातना भोगत आले, उपासमारी सोसत आले, अपमान सहन करत आले. आम्ही म्हणतो कि या सुंदर धरेवर आम्हाला देवा पुन्हा जन्म दे. पण जे सोसतायत ते खरच म्हणत असतील " जन्म मरण नको आता, नको येरझार "
परंतु कुठेतरी आशेचा किरण हा उगवेलच, कारण मी तर नेहमीच आशावादी असतो. दलीत समाजाचा उद्धार करण्यासाठी त्याच समाजातील मिलिंद कांबळे नावाचा तरुण पुढे जातो आणि डिक्की सारखी संस्था नावारूपाला आणतो, दलिताच्या उद्धारासाठी. नक्कीच हि संख्या बोटावर मोजण्या एवढी आहे पण हि संख्या वाढेल कारण सत्याचा जे शाश्वत आहे त्याचा ध्यास घेऊन जगणारी पिढी आज भारतामध्ये निर्माण होत आहे. बदल होत आहे, परिवर्तनाची आहे. जिच्यातून हा जाचमुक्त सुंदर दिवस उगवणार आहे. अशीच एक ऐकीव सुंदर ओळ समर्पित त्या सुंदर उद्धारास्तव, त्या पांडुरंगाला " तू बुद्धी दे , तू तेज दे … नवचेतना,विश्वास दे.जे सत्य सुंदर सर्वथा, आजन्म त्याचा ध्यास दे"
धन्यवाद …
अहमद शेख -९६९९९३६५७५