“मला विज्ञान आवडायचं, ग्रहतारे आवडायचे, निसर्ग आवडायचा आणि मी माणसांवरही प्रेम करायचो. मी हे विसरून गेलो कि, माणसं निसर्गापासून फारच पूर्वी तुटलेली आहेत. आपल्या भावना आपल्या स्वतःच्या राहिलेल्या नाहीत. आपलं प्रेम बनावटी आहे. आपले विचार गंजलेले आहेत.आपल्यातील सर्जनशीलता, आयुष्य कलेचा आधार घेऊन उभी रहात आहे. वेदना सहन करण्याची तयारी ठेवल्याशिवाय प्रेम करणं शक्यच राहिलेलं नाही“ हे शब्द आहेत रोहित वेमूला याचे, त्याने मृत्यूपूर्वी लिहिलेल्या पत्राच्या, मराठी अनुवादातील एक महत्वाचा मुद्दा म्हणजे वरील चार ओळी.
जेंव्हा माणूस आत्महत्येस प्रवृत्त होतो तेंव्हा एकतर तो कुणाच्यातरी दबावामुळे,राग,मनस्ताप किंवा हतबलतेमुळे, दुसरी गोष्ट अशी कि तो स्वतःला दोषी मानून, सभोवतालच्या वातावरणाला कंटाळून किंवा चुकीचा मार्ग निवडल्यामुळे आणि तिथून परत येण्याच्या वाटा बंद झाल्यामुळे. साधारणतः या गोष्टी एखाद्या व्यक्तीच्या जीवनाच्या अंतासाठी कारणीभूत ठरतात. खरं तर रोहितचं ते पत्र वाचल्यानंतर कितीही कठोर व्यक्ती असला तरी त्याच्या डोळ्यांतील आसवांना आवरू शकणार नाही, आणि खरंच या पत्राचा गर्भितार्थ समजून घ्यायला आपण कुठेतरी चुकतोय असं मला वाटतंय. संपूर्ण पत्र त्याने अतिशय विचार पूर्वक, राजकारणी आणि वेगवेगळ्या संघटनांच्या विचारधारेच्या वरती जाऊन लिहिलंय त्यामुळे त्याचं राजकारण तर होऊच नये पण नेमकं मानव जातीला आपण काय दिलं पाहिजे? का त्याच्या आत्म्यात आणि शरीरात अंतर पडल्याचं भासलं, आत्म्याचं अस्तित्व तो मानतो,तो प्रत्येकाच्या ठायी असतो असतो हेही त्याला मान्य. परंतु केंव्हा ?? जेंव्हा वेळ निघून गेली तेंव्हा. आणि त्याच आत्मक्लेशाने त्याला असे पाउल उचलायला भाग पाडले नाही कशावरून ? गटातटांच्या, पक्षीय, जातीय राजकारणाच्या वर जाऊन विचार करण्याचा सल्लाच एक प्रकारे रोहितने आपल्याला दिलाय, खरचं तो ज्या मार्गावर चालला होतं तो मार्ग कितपत योग्य होता? ज्या त्याच्या अपेक्षा त्या मार्गावरून जाताना पूर्ण करण्याची इच्छा होती त्या मार्गाने त्याच्या असलेल्या समाजाप्रती, देशाप्रतीच्या अपेक्षा कधीच पूर्ण होणाऱ्या नव्हत्या किंवा तो विचार आणि ती कृती कधीच योग्य नव्हती. ना ही स्थलपरत्वे आणि ना ही कालपरत्वे. हा विचार कारण गरजेचा आहे. तो एखाद्या व्यक्तीचं किंवा संघटनेचं नाव लिहून रिकामा झाला असता पण त्यानं असं केलं नाही. हि वाट कदापि त्याला त्याच्या ध्येयापर्यंत घेऊन जाणारी नव्हती म्हणून तो पुढे लिहितो “ कदाचित मी आजवर कायमच जग समजून घेण्यात चूक केली असेल.प्रेम,वेदना,आयुष्य,मरण काहीच समजलं नसेल मला तातडी कसलीच नव्हती, पण मी सतत धावत होतो. आयुष्य सुरु करण्यासाठी अनावर. सारखं . काही लोकांसाठी आयुष्य हाच शाप ठरतो. माझा जन्म हा जीवघेणा अपघात होता”
ज्या विचारसरणीचा तो अवलंब करत होता कदाचित ती चुकीची आहे कि काय म्हणून हे द्वंद्व त्याच्या मनात चालू असावं, काहीतरी शाश्वत शोधण्याच्या वेडात तो फसवेगिरीच्या,कालबाह्य झालेल्या बुरसट विचारांच्या खोल गर्तेत गेला होता जिथं केवळ अंधःकार आणि अन्धःकारच होता, त्या अंधारातूनही तो बाहेर निघाला असता परंतु बाहेर निघण्याचा जो मार्ग होता त्यालाच तो आत्तापर्यंत विरोध करत आलेला होता त्यामुळे प्रायश्चित आणि पश्चातापाने त्याला हा निर्णय घेण्यास भाग पाडले. अनेक धाडसी आंदोलनांचं नेतृत्व करणारा, बीफ फेस्टिवल, कीस ऑफ लव सारखे कार्यक्रम आयोजित करणाऱ्या, याकुब च्या फाशीचा विरोध करणाऱ्या संघटनेचा तो धाडसी कार्यकर्ता होता , जर त्याला मनात राग धरून, मनस्ताप करून आत्महत्या करायची होती तर त्यांने नक्कीच कुणाच्या तरी माथी हे खापर फोडलं असतं. पण हे हि सत्य आहे कि जेंव्हा माणसाला आयुष्यात सत्य गवसते त्यावेळी त्याच्यासाठी पृथ्वीवरील जीवन, संसारिक मोह माया हे सर्व काही शून्य होऊन जाते आणि तो अभूतपूर्व अशा निर्णयाला सामोरे जातो त्याचेच उदाहरण म्हणजे रोहित ने केलेली आत्महत्या होय.
माध्यमांनी व तथाकथीत बुद्धीवाद्यांनी (जे स्वतः नक्षलवादी कारवायांना पाठींबा देतात ) या गोष्टीवर चिंतन, विचार मंथन करावे न कि चार टाळकी घेऊन कशा प्रकारे रोहितचा खून झाला यावर चर्चेच गुर्हाळ चालवावे. आजकाल तर निखील वागळे नावाच्या नामांकित पत्रकाराला शीतल साठे नावाची एक नवीन विचारवंत, समाजसुधारक अशा प्रकारच्या चर्चेसाठी लाभलेली आहे आणि ते त्यांचा पुरेपूर उपयोग करून घेत आहेत. मी मराठी लाइव्ह नावाच्या वृत्तपत्राने तर आपल्या वर्तमान पत्रामधील जागा भरण्यासाठी याचा पुरेपुरे फायदा उचलला कुण्यातरी समाजसेवकाचा लेख आपल्या वृत्तपत्रामध्ये छापला आणि त्याने त्याच्या ठायी होते नव्हते तेवढे शब्द कसेही ओबड धोबड गुंफून, कुठलाही अभ्यास न करता संपादकांच्या हाती देऊन टाकले किमान संपादकांनी तरी त्याचा विचार करायला हवा होता. असो,
जो व्यक्ती मेला आहे मग तो कसाही असू देत त्याच्या नावाचं राजकारण राजकारण्यांनी करू नये, माध्यमांनी आपली नितीमुल्ये विसरून त्याच्या प्रेताचा मसाला करून तो आपल्या चॅनेल वरून विकू नये एवढी साधी गणितं न समजण्यासारखी भारतीय जनता राहिलेली नाहीये आणि म्हणूनच त्या विद्यार्थ्याने त्याच्या भूतकाळात तो किती चांगला होता/ नव्हता, याचं विवेचन मी इथे करत नाहीये कारण मला त्या बुद्धिवाद्यांच्या रांगेत जाऊन बसायचं नाहीये किंवा कुठल्याच प्रकारे माझी किंवा माझ्या संघटनेची पोळी त्याच्या आगीच्या चितेवर भाजून घ्यायची नाहीये. जर ही हत्या असेल तर ती दुसऱ्या तिसऱ्यांनी कुणी केलेली नसून स्वतःला पुरोगामी म्हणवणाऱ्या प्रतिगामी शक्तींच्या हट्टाने हि हत्या केलीय. आपला क्रांतीचा हट्ट, मार्क्स, लेनिन, माओ, चीग्वेरा यांना भारतामध्ये रक्तरंजित इतिहास घडविण्यासाठी घुसविण्याचा हट्ट, पण ते तर कधीच कालबाह्य झाले हे ह्यांच्या डोक्यात अजून घुसत नाहीये, भारतासारख्या अनेको जातीधर्माच्या लोकांच्या समूहाला हि परकीय विचार धारा लागू पडत नाही किंबहुना ती लागू करताना त्यांच्याच पदरी निराशा येतेय आणि त्याचा परिणाम म्हणजे कालची हि दुर्दैवी घटना. म्हणून आता यांनी बदलावे आणि कालबाह्य क्रांतीचा हट्टही सोडून द्यावा हे हि तितकेच सत्य.
अहमद शेख
९६९९९३६५७५
ashaikh251@gmail.com