पाटलांची गाडी वाड्यासमोर येउन थांबली, रामानं मागच्या हौदात बांधलेल्या बोकडाला उचलून खाली घेतलं, वाड्याच्या दारासमोर एक मेख मारून त्याला तात्पुरतं बांधून ठेवलं. गाडी पार्क करण्यासाठी बनवलेल्या पत्र्याच्या शेड मध्ये मोठ्या कसरतीनंतर पाटलांनी गाडी उभी केली, तेवढ्यात रस्त्यावरून जाणा-या हैदर ची नजर बोकडावर पडली, हा पक्का हाडाचा मुलाणी लगेच पाटलाला त्याने हटकलं,
' काय पाटील कितीला बसलं बसलं बोकाड ? गावजेवण द्यायचा इचार दिसतोय '
'चार हजारला बसलं बघ, आरं कंदुरी हाय न्हवं उद्या गडाला… समदां गाव ट्यांम्पुत भरून न्हायचाय जेवाया, आन तुला बी यायचंय, लेका तुज्याशिवी मुंडी कशी सुटल बक्य्राची ?'
'बरं ,बरं जाऊ कि ,तुमची कंदुरी आन आपण न्हाय म्हंजी? बरं मी निघतो'
'बरं ,बरं... ये रामा आरं त्या बोकडाला शिवरीचा कवळा पाला आणून टाक बाबा,सकाळ पास्नं जनावर उपाशी हाय'
रामानं पाला आणून टाकला पण सोन्याचं मन काही त्या पाल्यात लागत नव्हतं, त्याचा किश्या त्याच्या नजरेत पुरेपूर साठलेला होता, डोळ्यातून पाणी वाहून वाहून डोळ्याला सुखलेल्या आसवांची किनार चढली होती. पाटलांनी शेख फरीद साहेबांना नैवद्य दाखविण्याची पूर्ण तयारी केली होती आणि या नैवेद्याचा मेन आयटम म्हणजे सोन्या बोकड. शेख फरीद साहेब, ह्यांचा नैवद्य किती स्वीकारतील माहिती नव्हतं पण त्यांच्या कबरीची देखभाली करणाऱ्या फकिरांची आजकाल चांदीच होती. ओसाड असलेला पूर्वीचा गड, शेख फरीद साहेबांच्या दर्ग्यामुळे बराच फेमस झाला होता आसपासच्या दहा बारा तालुक्यातून दर गुरुवारी इथे बकऱ्यांच्या मटणाची मेजवानी लोकांना मिळत असे.
आपल्या पाटलांनाही अशी वर्षातून किमान दोनदा तरी हुक्की येत असे, पुण्य कमवण्यासाठी संपूर्ण गावाला दर्ग्यावर नेवून जेऊ घालणे हे त्यांचे वर्षभराचे किमान दोन कार्यक्रम, आज या कार्यक्रमाचा बळी होता सोन्या बोकड.
दुसरा दिवस उजाडला नेहमीप्रमाणे पाटलीणबाई पहाटे पहाटे उठून रस्त्यावर सकाळचा कार्यक्रम उरकून आल्या. भल्या मोठ्या वाड्याचा दरवाजा आपल्या आवाजानेच निम्मा गाव जागा करत असे, आणि या आवाजामुळे रस्त्यावरून जाणारी माणसे पाटलीणबाईच्या परत जाण्याची वाट बघत मारूतीच्या पारासमोर शेकोटी पेटवून बसत. पाटलीन बाई पुन्हा वाड्यात जाताच गावगाडा सुरु होई, तसा गावगाडा सुरु झाला. ओल्या अंगानं गावचा गुरव नेहमीप्रमाणे वेशीतल्या तीन चार देवळांत पाणी घालू लागला, हा त्याचा नित्यक्रम त्याची फळे त्याला वर्षाच्या शेवटी सुगीच्या दिवसांत मिळत असत.
पाटलांच्या घरात आज उत्सवाचं वातावरण होतं. सकाळ सकाळ कोळ्याचा टेम्पो वाड्यावर येऊन थांबला होता. रामा सगळ्या गावात कंदुरीचं अवतान देऊन आला होता. सकाळी दहाच्या सुमारास टेम्पो भरायला सुरुवात झाली. गावातले फुकटे, रिकामटेकडे, दररोज पान -गुटखा खाऊन देऊळांच्या भिंती रंगवणारे देशाचे उज्वल भविष्य असणारे टेम्पो येण्याची वाटचं पाहात होते.

कोळ्यानं टेम्पोचा स्टार्टर मारला आणि रॉकेलमध्ये आकंठ बुडालेल्या इंजिनातून धुराचा लोट बाहेर पडू लागला टेम्पोची घरघर ऐकून गावातल्या चिल्ल्यापिल्ल्यांनी गराडा घालायला सुरुवात केली. पाटलाच्या मजूरांनी टेम्पो भरायला सुरुवात केली. लाकडं, भांडी, पाण्याच्या टाक्या, सगळं सामान भरलं. टेम्पोच्या
मधोमध लाकडी फळ्या टाकून टेम्पोचे दोन भाग केले होते. काही मंडळी टेंम्पोच्या टपावर बसणार हे ठरलेलंच मग भले टेम्पो आतमध्ये रिकामा असला तरी चालेल यांची जागा ठरलेली.रामानं सोन्याला भल्या सकाळी पाण्याने स्वच्छ धुतला. चार पाच पोरांची मदत घेऊन त्यानं सोन्याला टेम्पोत चढवला. गावच्या मुलाण्याशिवाय (बलुतेदर किंवा अलुतेदारांमधला एक) बोकड कापणं म्हणजे पापचं. स्वत: पाटील हैदर मुलाण्याला बोलवण्यासाठी त्याच्या
घरी गेले.
'ऐ
हैदऱ्या आरं कुठं हायस, जायचा टाईम झाला की लेका'
'आलो
पाटील थोडा सुरमा चढीवतोय डोळ्यात' कुठल्यातरी अंधाऱ्या खोलीतून आवाज आला
'तुझं
बरीक चांगलाय बाबा, सुरमा चढीवतो आत्तर लावितो चल लवकर ट्याम्पू एकदम पॅक झालाय'
'तुम्ही व्हा म्होरं आलोचं दोन मिनटात' हैदर आतूनच बोलला
'बरं
बरं ट्याम्पू पाठवतो म्होरं आपुन जाऊ जिप्ड्यात '(जीप)दारातूनच
ओरडून पाटील निघून गेले.
पाटलांनी
टेंम्पो खचाखच भरविला होता निम्मा गावच जणू त्यांनी कोंबला होता. पाटलांच्या घरच्या मंडळीसाठी वेगळ्या वाहनाची व्यवस्था केली होती.
तसा हैदरही गमछा गुंडाळत डोक्याची गोल टोपी सांभाळत लगबगीन पाटलाच्या जवळ आला..
'ऐ कोळ्या हाण गाडी'
गाडी सुरू झाली, आणि लोकांनी एकच गजर केला - 'शेख फरिद साहेब की दो चारो दिन' ही घोषणा म्हणजे शेख फरिद साहेबांचा जयजयकार होय.
गाडी गावातून आदळआपट करत कशी बशी हायवेला पोहोचली मागोमाग पाटलाच्या घरातील पाहुणे मंडळींनी खचाखच भरलेली ट्रॅक्स आणि त्याच्यापाठोपाठ पाटलांची जीप....हायवेला लागेपर्यंत पाटलांची पांढरी मिशी आणि हैदरची दाडी धुळीने माखली होती.
टेम्पोनं उस्मानाबादचा छोटासा घाट चढायला सुरूवात केली. पण रॉकेलवर चालणारी गाडी...लवकरच तिचा दम लागला...दहाबारा माणसं गाडीतून खाली उतरली आणि वजन कमी केल्यावर गाडी कशीबशी घाट चढून गेली.
भर बारा वाजलेल्या होत्या पाटलांचा सगळा लवाजमा शेख फरीद बाबांच्या गडावर पोहोचला.टेम्पो थांबताच टपावर बसलेल्या पोरा ठोरांनी उड्या मारल्या हात पाय झटकत घोळक्यानं फिरू लागली. टेम्पोच्या आत बसलेली माणसं धोतर-सदरा झटकत, बाया साड्या सावरत खाली उतरली...बराच वेळ ताटकळून बसलेली मंडळी आता थोडीशी रिकामी झाली होती. राजाच्या पोरानं आन्याच्या बायकोच्या मांडीवर उलटी केली होती एवढाच काय तो त्रास झालेला होता.तशी आण्याची बायको साऱ्या प्रवासात पोराला शिव्या घालत होती.
'बाई या मटणापायी आली, आन् ह्या पोरानं सगळा मुडहाफ केला बया
ऐ जने तुला संबाळाया येत न्हाय व्हय ह्या गाबड्याला'
तशी जनी उर्मट बोलली 'मी काय बुक्या घालून वकीवलं व्हय त्याला ? '
भांडणं कशी बशी मिटली...
टेम्पोच्या बाजूला पाटलीची उघडी जीप आणि त्याच्या मागे ट्रॅ्क्स अशी पार्किंगची व्यवस्था.पाटलाच्या घरातल्या बायका ट्रॅक्समधून उतरल्या नव्या कोऱ्या साड्या नेसलेल्या बायका उन्हामुळ चमकत होत्या साड्या झगामगा करत होत्या.ऊन वाढत होत. सोबत आलेली गडी माणसं कामाला लागली, बाया स्वयंपाकाच्या कामाला लागल्या, हैदर सुरीला धार लावू लागला, रामानं कडब्याच्या् गंजीवरून आणलेली ताडपत्री टेम्पो आणि एका बाभळीच्या झाडाला बांधून तीस चाळीस माणसं बसतील एवढी सावली केली. सावलीत सगळी व्यवस्था केली होती.बीनकामाची डोकी गडाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात जाऊन पत्त्याचा डाव मांडून बसली. पोट धरून उतरलेली डोंगराच्या आडोशात कुठतरी रिकामं व्हायला गेली.
'ऐ मुशा त्या बोकडाला काढ बाहीर' रामा मुसाभाईकडे बघून ओरडला...गावातला मुसाभाई हा पन्नास पंचावन्न वर्षांचा व्यक्ती थोडक्यात हा रामाचा बॅचमेट.
'हां लगीच काढतू'-मुसा ओरडला
सोन्या आतमधे उदास बसलेला होता. त्याच्या गळ्यात बांधलेल्या दोरीला पकडून मुसानं त्याला ओढलं
'हर्रर्रर्र च्यक च्यक..बक्र लईचं दांड हाय राव, आवरत न्हाय,
इस पंचीस किलूचं आसल ब्वॉ...आन लई निबर बी हाय'-मुसा
'आरं आसू दी की तासबर जास्त शिजीवलं की व्हतय नरम'-रामा
'ऐ आरं आना लवकर त्याला, लोकं लई भुकाजल्यात, दिस मावळायच्या आत गावाकडं निघायला बरं, काय पाटील' हैदर बोलला
'व्हय.व्हय' पाटील पानाची पिशवी शोधत शोधतच ओरडले.
हैदरची सुरी घासून झाली व्हती. पाटील एका कोपऱ्यात पानाला चुना -काथ लावत बसले होते
रामानं सोन्याला(बोकडाला) हैदरच्या जवळ नेलं. हैदर,रामा आणि मुसा तिघांनी सोन्याला पकडं होतं त्याच्या गळ्यातला कंडा सोडताचं सोन्यानं जोरदार हिसका दिला आणि तिथून धूम ठोकली.सोन्या वजनानं भरलेला होता.अंगात ताकद होती आणि त्याच जोरावर त्यानं जोरदार हिसका दिला मुसाभाई दोन फर्लांग लांब जाऊन पडला, रामा ओरडला ..
'पाटील बक्र निसटलं'
'पळालं पळालं' म्हणेपर्यंत सोन्यानं डोंगराचा तळ गाठला
पाटील धोतर सांभाळत उठले
'आरं येडझव्या मला सांगत काय बसलाय पळ त्याच्या मागं, ऐ आरं धरा त्याला न्हायतर उपाशी जावं लागल गावाकडं'
आजूबाजूला बसलेली गावातली सगळी माणसं सोन्याच्या मागं धावू लागली, बायका हैरान झाल्या, मटणाच्या आशेपायी सकाळची न्याहरीपण न केलेली माणसं येड्यागत सोन्याच्या मागं धावू लागली, मोठमोठ्या दगडातून सोन्या काही वेळातच नजरेआड झाला,आणि आता त्याची शोधा शोध सुरू झाली, पाटील थोडफार धावून परत आले, सोन्या दिसेनासा झाल्यावर त्यांनी मुसाला. काही पैसे काढून दिले
'मुशा जा बाबा गावातनं पाच किलू चिकन घिऊन ये, मला न्हाय वाटत आता बक्र घावल,किमान बाया पोरं तरी खात्याल,' गडाच्या पायथ्य़ाशी एक गावही वसलेलं होतं
मुसा मुंडी हालवत निघून गेला
इकडे सोन्याची शोधाशोध सुरू होती.
बाब्या आणि रमजा ही गावातील पंधरा सोळा वर्षांची दोन इरसाल कार्टीही त्याच्या मागं धावत होती
'बाब्या आरं थांब जरा इतका मोठा डोंगर उतरून आलोया लई दाट लागलीया, थांब जरा रिकामा व्हतो' रमजा ओरडला
'व्हय व्हय मला बी लागली'
दोघही समोरच्या डोंगराकडे तोंड करून टाकी रिकामी करू लागले
'आयला उगच काशी केली, आय रानात गेली म्हणून इकडं कल्टी मारली तर ही उपासमार'- रमजा
'म्या बी गाय दावनीलाच बांधलीया आबा लई हानतय आता रातच्याला'
'बाब्या बक्र....'
'कुठाय??'
'ते समोरच्या डोंगरावर'
'आरं इतक्या वर जायचं व्हय आता'
'चल आयघाल्या एवढा आलाय तर आजून थोडा पळकी'
रमजा पुढ पळाला..
बाब्या मागच्या माणसांना ओरडला,
'ऐ बक्र दिसलं हिकडं या हिकडं'
सगळी माणसं आवाजाच्या दिशेने धावू लागली
पूर्ण डोंगर चढेपर्यंत बराच वेळ निघून गेला, तोपर्यंत सोन्या तिथूनही गायब झाला.
इकडे मुसा चिकन घेऊन आला, बायकांनी नाकं मुरडत मुरडतच त्याची ढवळाभर आमटी केली.
लेकरं आणि बायकांनी जेवणं उरकून घेतली.पाटलांची भूक पुरती मेली होती बायकांनी विनवणी करूनही पाटील जेवले नाहीत. सोन्या पाटलांच्या डोक्यात गेला होता. शेख फरीद साहेबांचा नैवद्यच पळून गेला होता...
संध्याकाळचे साडेपाच वाजले होते पुरता हिरमूड होऊन पाटील माणसांची वाट बघत बसले होते...
तेवढ्यात दोन पोरांनी एक जनावर पकडून आणल्याच त्यांना धुसर धुसर दिसत व्हतं...
पाटलांनी गळ्यात लटकवलेला मोठ्या भिंगाचा चष्मा डोळ्यावर लावला तर समोरून बाब्या आणि रमज्या सोन्याच्या दोन्ही कानाला पकडून त्याला घेऊन आले होते.त्यांच्या मागे सगळी माणसं दमलेल्या अवस्थेत येताना दिसत होती.
त्याचं झालं असं होतं की सोन्या एका झाडाखाली दमून बसला होता.
बाब्या जनावरात वावरणारा पोरगा व्हता, त्याला सोन्या दिसला तो रमजाला हळूच बोलला
'रमजा ते बघं पुढच्या खसपाटात बक्र बसलंय'.
रमजा धावणार तोच बाब्यानं त्याला आडवलं
'ऐ आरं थांब जरा मी पकडतू त्याला'
बाब्यानं गुराख्याच्या आवाजात त्याला आवाज दिला
तसं सोन्यानं कान टवकारले, सोन्याला आवाज ओळखीचा वाटला. ओळखीचा म्हणजे किश्याचा...
सोन्याच्या जीवात जीव आला, बाब्याच्या हातात चिंचेचा पाला होता बाब्यानं तो सोन्याला दाखवला
सोन्याचा बाब्यावर अधिकच विश्वास बसला, आपल्या किश्सायारखाचं कुणीतरी आहे म्हणून सोन्या जागीच बसला बाब्या हळूहळू सोन्याजवळ पोहोचला, बाब्याच्या मागे रमज्या दबक्या पावलानं आला. बाब्या सोन्याजवळ पोहोचला सोन्याला पाला खायला दिला, सोन्याचा विश्वास अधिकच दृढ झाला.पाला खाईपर्यंत रमजा बाब्याजवळ पोहोचला.दोघांनी सोन्याचे दोन्ही कान पकडले.त्यामुळे त्यांची पकड मजबूत झाली. सोन्याला कळून चुकलं की यामध्ये आपला किशा नाहीये. आपला किशा कुठेतरी दूर राहीलाय. आणि आपला अंत जवळ आलाय. कोणतीही हालचाल न करता बैमान आणि विश्वासघातकी माणसांबरोबर सोन्या निमूटपणे चालू लागला.
पालावर पोहोचताच पाटलांनी हैदरला त्याची मुंडी सोडवायला लावली.
संध्याकाळचे सहा वाजले होते. दहा बारा माणसांनी सोन्याला पकडलं, हैदरने सुरी चालवली सोन्याच्या नरड्यातून भळाभळा रक्त वाहू लागलं. वेदनेमुळे सोन्या थोडा ओरडला कदाचित ती किशाला मारलेली शेवटची हाक होती.
हैदरनं मुंडी वेगळी केली, लगेच त्याचं धड उलट टांगून कातडी सोलली गेली. एका घमेल्यात हैदरनं त्यांच कलेजी( काळीज) काढून टाकली, तसं ते काळीज धड-धड उडू लागलं....
जवळच किश्याच्या वयाचं एक पोरगं त्या धडधडणाऱ्या काळजाकडे कुतूहलानं पाहत होतं
...का? माहित नाही..
समाप्त....
अहमद शेख
9987479213