मी पुढे पळत होतो, मागे काही लोक माझा पाठलाग करीत होते . आता खूप थकलो विचार केला थांबतोच आता, कोण आहेत हे लोक, ते तरी कळेल. मी धापा टाकत-टाकत थांबलो तोच मागून माझी एकाने कॉलर पकडली, आणि खाली गेलेली माझी मान वर उचलत बोलला ' पैसे घेऊन कुठे पळत होतास, सांग लवकर कुठल्या पार्टीचा आहेस ?' मी श्वासावर नियंत्रण मिळवीत बोललो ' अरे मी कुठल्या पार्टीचा नाहीये, मैत्रिणीच्या लग्नाच्या पार्टीत गेलो होतो (अतिशय केविलवाणा चेहरा करीत ) आधीच मैत्रिणीच्या लग्नाचं टेन्शन आलंय,' मी वैतागून बोललो ' आणि तुम्ही कोण ,माझ्यापाठीमागे का लागलायत ?' तोपर्यंत एकाने माझ्या खिशात हात घालून माझी एकुलती एक ५० रु. ची नोट बाहेर काढत बोलला ' आम्ही निवडणूक आयोगाच्या भरारी पथकातील अधिकारी आहोत, सांग हि नोट कुठून आणलीस ? आणि कुठे घेऊन जात होतास? सांग लवकर '
तोपर्यंत एकाने माझ्या कानशिलात भडकावली ,जशी त्याने कानाखाली वाजवली तसा मी बेड वरून खाली आपटलो हो, अंगाला पूर्ण घाम आला होता. आणि तब्बल पाच मिनिटांनंतर माझ्या लक्षात आले कि मी स्वप्न पाहत होतो . तसा मी तिथून उठलो आणि थेट खुंटीला अडकवलेल्या माझ्या शर्ट कडे धावलो आणि पहिले कि माझ्या खिशात ती नोट होती. मी दीर्घ श्वास सोडला आणि वर्तमान पत्र वाचायला हातात घेतले आणि पहिलीच बातमी वाचली कि अमुक या ठिकाणी आमुक इतकी रक्कम भरारी पथकाने जप्त केली आणि माझ्या लक्षात आले कि स्वप्नात हेच लोक माझ्या पाठीमागे धावत होते, डोक्यात वीज चमकली तोच मैत्रिणीला दूरध्वनी लावला तिने पण अजून लग्न केलेलं नव्हतं तसा विचारही तिने केलेला नव्हता. तिच्या शिव्या खात-खात मी फोन ठेवला, एरवी तिच्या शिव्यांचा मला राग येतो पण आज बरं वाटलं कि तीने असा काही विचार वगैरे केलेला नाहीये .पण मी नंतर विचार केला काय हे विलक्षण इलेक्शन, वयक्तिक जीवनातही याचे परिणाम होऊ लागले.
अहो तीन दिवस झाले या महागाईच्या जमान्यात एकच पन्नास ची नोट घेऊन फिरतोय मी, आणि हे पहा कि निवडणुकीचे दिवस आले आणि सगळीकडे गोनी-गोनी भरून नोटा सापडू लागल्या हो . जसे-जसे पृथ्वी पासून वर जावे तसे-तसे वातावरणात बदल होताना आपणास दिसतो, जसे-जसे मुंबईपासून दक्षिणेकडे आणि उत्तरेकडे जावे तसे-तसे या रकमांमध्ये बदल होताना आपणांस दिसतो. भूगोलाचा आणि माझा काही संबंध नाही पण लोकांना गोल बनवणाऱ्या नेत्यांना मी चांगलाच ओळखतो. बातमी वाचूंन कळाल कि अमळनेर जवळ एका बँकेचे १ कोटी रुपये सापडले म्हणे,आता हि रक्कम कुणाची नेमकी माहित नाही पण रक्कम तर मोठी आहे, तसेच राजगुरुनगर नगर च्या एका उमेदवाराच्या गाडीतून २० लाख रुपये जप्त झाले, थोडं पुढे जाऊ लातूरला चार लाख जप्त झाले, थोडं वरती येऊ अक्कलकोट मध्ये म्हणे एका पक्षाचे कार्यकर्तेच पैसे वाटताना पकडले गेले. नागपूरमध्ये ७० लाख जप्त अरे काय किती किती ? असो थोडं अलीकडे येऊ परभणी मध्ये एका पक्षाच्या सर्वात वरिष्ठ कार्यकर्त्याच्या गाडीत परत चार लाख सापडले हो, एवढ्यावरच नाहीहो थांबलं म्हणे त्या गाडीत त्यांच्या महत्वाच्या कागदोपात्रांसोबत त्यांचे शुभ्र वस्त्र आणि अंतर्वस्त्र पण हो…हद्द झाली आता , आता त्यांच्या पक्षाने पण ते कबूल केले कि हि त्यांचीच गाडी होती. अहो कबूल तर करावाच लागेल ना "अंदर कि बात जो है " मग परत कार्यकर्ते म्हणू लागले कि माणूस परगावी फिरत असतो एवढी रक्कम तर पाहिजेच न जवळ , त्यांनी काय फुटपाथ वर झोपावे का ? अरे पण निवडणूक आयोगाने तर पन्नास हजार रुपयांचीच मर्यादा दिली आहे आणि चार लाख… आणि राहिली गोष्ट त्यांच्या झोपण्याची, मत मिळवण्यासाठी कुठल्याही थराला जाता, एखादवेळी फुटपाथच्या थराला डोकं लावून झोपलात तर फुटपाथवर झोपणाऱ्या गरीबांची मतं तरी मिळतील .
अहो तीन दिवस झाले मी पन्नास रुपयांची नोट घेऊन फिरतोय तरी निवडणूक आयोग आमच्या स्वप्नात येतोय आता विचार करतोय कि हि नोट घरीच ठेऊन बाहेर पडावं, पण नंतर अजून भीती वाटतेय कि घरी या लोकांचा छापा पडला तर काय करू ?? आता तुम्हीच सांगा कि काय करू हिचं ??
पन्नास रुपये लपवण्याच्या चिंतेने माझे केस उडू लागलेत, कोट्यावधी रुपये लापावणाऱ्या नेते मंडळींना "मानलं बुवा" आपण…

Nice shaikh sahab
ReplyDeleteसुंदर लिहिलंय अहमद..
ReplyDeleteJevada sundar lihalat tevde sundar tar tumche swapna ahet.....
ReplyDelete