भारतातल्या सगळ्यात मोठ्या उत्सवाला सुरुवात झाली अन सारा महराष्ट्र एका वेगळ्या वातावरणाने भरून गेला तसा हा उत्सव गाव पातळीपासून ते देशपातळी पर्यंत कमी अधिक दिवसांनी साजरा केला जातो. आणि या उत्सवात लोकांनी श्रद्धेने पूर्ण सहभाग घेतला तर त्याचा आनंद हि तितकाच चिरकाल राहतो, परंतु आमचे लोक या उत्सवात सहभागी होण्यासाठी तसे फारसे उत्सुक दिसत नाहीत, आणि नंतर तक्रारींना उधान…
असो, हा उत्सव म्हणजे लोकशाहीचा आणि याच उत्सवात सहभागी होण्यासाठी मी मुंबईहून गावाकडे म्हणजे सोलापूर कडे १३ तारखेच्या सकाळी रवाना झालो,तसे सोलापूर हून पण माझे गाव जवळ -जवळ ७० किमी दूर मराठवाड्याच्या सीमेनजीक वसलेले. सकाळी मुंबईहून निघालो आणि पोहोचता - पोहोचता मला संध्याकाळचे ७:३० वाजले होते. गावात पोहोचताच,घरी जाऊन सर्व साहित्य ठेवतो न ठेवतो तोच माझा मित्र मोटारसायकल घेऊन दरवाज्यासमोर उभा राहिला, पटकन मला गाडीवर बसविले पुढे जाताच अजून दोघे जन मागून बसले एकूण चार जण गाडीवर बसले. तिघांच्या मध्ये मी पुरता चेम्बून गेलो होतो. गाडी चा एकस्लेटर वाढला तशी गाडी रस्त्यावरचे खड्डे चुकवत धावू लागली …
" अरे मध्या कुठे घेऊन चाललाय ? " मी असे आश्चर्याने विचारताच मागे बसलेले हर्षद आणि सागर मोठ्या मोठ्या ने हसू लागले सागर त्याचे लाल दात दाखवत बोलला " च्या मायला मुंबईला गेला माणूस कि कसा बामनावाणी बोलतुया बग हर्षा " परत दोघे दात काढू लागले तोपर्यंत गाडीच्या टाकीवर बसून गाडीची कसरत करणारा मध्या बोलला "अबे देवकर धाब्यावर जातुया आपुन, साहेबांच्याकडून पार्टी हाय " "आरं परवा मतदान नाय का ,त्याच्यामुळ" मागचा हर्षा पुढे सरकत सरकत बोलला. "च्यामारी असंय का ?" मी माझी गावरान भाषा सावरत सावरत बोललो.
साहेब मागचे तीन वेळा आमदार होते, साहेबांचे जेवढं वय होतं तेवढंच वय त्या रस्त्याचं पण होतं ज्या रस्त्यावरून आम्ही जात होतों. मी परत बोललो " इतक्या दिवस झालं साहेब आमदार हायेत, हि रस्ता कधी नीट होणार रं " " आरं कालच्या सभेत बोलले सायेब, सगळ्या तालुक्यात रस्तं करणार म्हणून" मध्या खड्यातला चिखल उडवत बोलला . मी मनातल्या मनात बोललो चला या मुद्द्यावर साहेब परत निवडून येणार. बघता बघता आम्ही धाब्यावर पोहोचलो . साहेबांच्या कार्यकर्त्यांनी धाब्याच्या मालकाला सांगून ठेवलेलं कि 'जो कोणी आमच्या नावावर खादडायला येईल त्यांची चांगली खातिरदारी करायची' म्हणूनच कि काय कालपर्यंत मध्याला दरवाज्यावर उभं पण राहू न देणारा धाब्याचा मालक आज त्याला मालक मालक बोलत होता. तोपर्यंत हर्षानं दाबून ऑर्डर दिली मी त्याला बोलण्याचा प्रयत्न केला "आरं इतकं कशाला ?" इतका उशीर गप्प बसलेला सागर बोलला "गपये शेमण्या ,दिस रात काम करून हाडं बाहीर आली आमची, पाच वर्षात्न एकदाच घावतोय सायेब , थोडा उडवला शितुडा आमच्या अंगावर तर काय झालं ?' परत मध्या बोलला "हे बग जर बारीच्याला आमि तुजं आईकतो, तू सांगील त्या परमानं वागतो, आता आमि सांगील त्या परमान तू वागायचं आईकायचं आन वागायचं पंधरा तारकी नंतर तूजं पर्वचन आईकायला आमी रिकामं" "आता काय आमि जरा बीजी हायेत सायबांच्या परचारात" सागर ने परत लाल दात दाखवत डायलॉग मारला, परत सगळे दात काढू लागले…
मी दीर्घ श्वास सोडून बोललो "ठीक हाय बाबांनो, जशी तुमची मर्जी" तोपर्यंत समोरचा टेबल मांसाहरी आणि शाकाहरी पदार्थांनी भरून गेलेला होता. "आयम्या लैच खराब झाला राव तू, आता खाय दाबून सायबांच्या नावानं" , जेवण करता करता राजकीय चर्चा हि जोरात सुरु होत्या, हे तिघं जण मला जणू आज राजकीय विश्लेषक वाटत होते, सर्व 'एक्झिट पोल' आज फिके पडणार असं वाटत होतं. तोपर्यंत सर्व ताटं रिकामी झाली होती . काडीने दात टोकरत टोकरत मध्या बोलला "ऐ चला लवकर लवकर ,आटपा पटापट आजून बार्शीला जायचंय आपल्याला" "कशाला ?" मी पाणी पीत पीत बोललो. सागर बोलला "आरं उद्याच्याला मतदार यादी आणायची हाय लोकांस्नी चिट्ट्या वाटयाच्यात" मध्या कानाजवळ येउन हळूच बोलला "आन पैकं बी वाटायचं"
आम्ही परत बार्शीला म्हणजे तालुक्याच्या दिशेला निघालो, रात्रीचे ८:३० वाजले होते. इकडच्या तिकडच्या गप्पा मारत मारत आम्ही साहेबांच्या बंगल्यावर पोचलो. साहेबांचा पि.ए समोर मोठठी यादी घेऊन उभा होता सगळ्यांना मतदार याद्या देण्याचं काम तो करीत होता. आमच्या गावच्या यादीचा गठ्ठा घेऊन आम्ही निघालो. रात्री उशीर झाला होता, त्याच त्या खड्ड्यांतून गाडी धावत होती. माळावर येताच गावात लागलेले दिवे चमकत होते मी घरच्यांना अजून भेटलोच नव्हतो. पण त्यांच्या भेटीपेक्षा माझ्या मनात निवडणूक, आमदार , मतदान या आशयाचे विचार घोळत होते. साहेबांच्या कृपेचे कुणावर किती शिंतोडे उडणार याचाच विचार राहून राहून मनात येत होता…
अहमद शेख -९६९९९३६५७५

No comments:
Post a Comment