भगत सिंगांच्या इतिहासाचे - उपहास, विपर्यास आणि भविष्य.
आज शहीद भगत सिंग यांची १०७ वी जयंती त्यानिमित्त हा आगळा वेगळा केलेला उहापोह, त्यांनी या देशासठी दिलेल्या बलिदानाचे मोल या देशालाच नव्हे तर संपूर्ण जगाला माहित आहे, ते तर सांगण्याची काही गरजच नाही कारण भगत सिंग म्हटल्यानंतर आपसूकच त्यांच्या नावाच्या आधी शहीद हे विशेषण लागून जाते.
वयाच्या २३ व्या वर्षी फासावर चढणारे भगत सिंग हे एकमेव क्रांतिकारक असावेत , जगामध्ये जेंव्हा-जेंव्हा क्रांती झाली तेंव्हा-तेंव्हा त्या क्रांतीचे शिलेदार हे तरुण युवकच होते याचा इतिहास साक्षीदार आहे मग त्यामध्ये जगाच्या अटकेपार भारतीय संस्कृतीचा झेंडा रोवणारे स्वामी विवेकानंद असोत, आझाद हिंद सेनेचे सुभाषबाबू किंवा मग भगत सिंग असोत, प्रत्येक आघाडीवर हा युवकच होता.
आणि आजही युवकांची गरज या देशाला आहे, पण सर्वात जास्त युवक तर आज याच देशात, तरी आपण म्हणतो कि या देशांला युवकांची गरज आहे. गरज खऱ्या अर्थाने या युवकांच्या ताकदीची आहे, त्यांच्या वैचारिकतेची आहे जी आज कुठेतरी स्वैराचार, अनाचार ,अत्याचार, हिंसाचार या कडे वळताना दिसतेय. आणि हे का याचा बरिकतेने विचार करण्याची गरज आज निर्माण होत आहे.
भगत सिंगांच्या नावाखाली आज अनेक संघटना समाजामध्ये अराजकता माजवताना दिसताहेत, व्यवस्थेच्या विरोधात तरुणांना भडकावण्याचे काम करत आहेत, भगत सिंगांनी जे केलं ते या भारत मातेसाठी केलं, त्यांनी संसदेत स्फोट केला पण एखाही व्यक्तीचा त्यात मृत्यू झाला नाही, काकोरी कटामध्ये लुटलेला सर्व ऐवज इंग्रजाच्या ताब्यातला होता एकाही भारतीयाला त्याची झळ त्यांनी पोहोचू दिली नाही, त्यांची विचारधारा हि तत्कालीन परकीय सत्तेविरोधात होती, त्यांचे विचार,त्यांची कृती देशहितासाठीच होती – देशाच्या स्वातंत्र्यासाठीच होती मार्क्स, लेनिन, माओ किंवा चीग्वेरा साठी नव्हती, स्वकियांशी मतभेद जरूर असतील परंतु विरोध कधीच नव्हता हे जाणून घेण आजची गरज आहे. आम्ही लहानपणापासून भगत सिंगाना वाचत आलो अभ्यासत आलो, त्यांच्या नावाच्या आधी आम्ही शहीद वाचले पण आज कॉम्रेड कुठून आले हे कळतच नाही. म्हणजे काहींना शहीद पेक्षा परकीय अशाश्वत विचारावर आधारित तयार केलेलं तथाकथित पद हेच श्रेष्ठ वाटतंय याची खंत वाटल्याशिवाय रहात नाही. आम्ही आजपर्यंत त्यांच्या हैट घातलेल्याच तस्वीरी पहिल्या जी हैट त्यांनी एका संकटातून निसटण्यासाठी घातलेली होती, तीच परकीय पद्धत आजपर्यंत आम्हाला दाखवण्यात आली. हि टोपी त्यांनी आधी कधीच घातलेली नव्हती किंवा नंतरही कधी घातली नाही मग अस का ? याचाही विचार आम्ही कधी केला नाही परंतु आज तो विचार करण्याची वेळ खऱ्या अर्थाने आलेली आहे.
कारण या सर्व गोष्टींचा फायदा आज या देशामध्ये अंतर्गत कलह वाढवण्यासाठी बाह्यशक्ती घेत आहेत, हे पण आज जाणून घेतल पाहिजे आणि खऱ्या अर्थाने हि जबाबदारी तुमच्या माझ्यासारख्या तरुणाची आहे इथे पळवाट नाहीये आणि ती शोधणाऱ्या युवकाला कदाचित भारतीय म्हणवून घेण्याची लाज वाटत असावी.
अंतर्गत कलह वाढवणारा नक्षलवाद आणि त्याच्या समर्थित संघटना या भगत सिंगांचा पुरेपूर गैरवापर करताना दिसताहेत भगत सिंगा वरती एखादं गीत तयार करायचं आणि तरुणांना व्यवस्थे विरोधात चीथवायचं त्यांच्या हातांमध्ये हत्यार द्यायचं आणि रक्तरंजित नरसंहार करून क्रांतीच नाव पुढे करायचं. भगतसिंग आज असते तर या लोकांना आणि या विचारधारेला कधीच देशाबाहेर हद्दपार केल असतं. देशभक्ती मंच, कबीर कला मंच, लोकायत अशी नावे धारण करून महाविद्यालय परिसरात नक्षलवादी चळवळी पसरवण्याच काम आज दुर्दैवाने जोमात सुरु आहे ते केवळ तरुणांच्या दुर्लक्षामुळे.
हिंसाचार ज्यांना कधीच मान्य नव्हता, भारतीयांसाठी जे फासावर चढले असे भगत सिंग, गरीब आदिवासींना लुटणाऱ्या, फक्त संशय घेऊन निरपराध्यांचा गळा कापणाऱ्या, वर्गशत्रु ठरून एकाच जिल्ह्यात वर्षाला सातशे सातशे वनवासींच्या कत्तली करणाऱ्या नक्षलवाद्यांचे व त्यांच्या या समर्थित संघटनांचे कधीपासून आदर्श ठरले याचापण साकल्याने विचार झाला पाहिजे, याची पण चर्चा झाली पाहिजे.
भगतसिंगांचा इतिहास तर सर्वच आपल्या परीने सांगण्याचा प्रयत्न करतील कदाचित बरोबर हि सांगतील परंतु याच इतिहासच भविष्यात जे मातेरे होण्याच संकट आज आपल्यापुढे उभं ठाकलं आहे, त्याला एका वेगळ्या चौकटीतून मांडण्याचा केलेला हा प्रयत्न.
पुनश्च एकदा भगत सिंगांना त्यांच्या कार्यकर्तृत्वाला अभिवादन …
जय हिंद…

No comments:
Post a Comment