हिंदुराष्ट्र है इसका मतलब यह नहीं होता की इसमें मुसलमान नहीं होंगे. जिस दिन
ऐसा कहा जायेगा की यहां मुसलमान नहीं चाहिए उस दिन वह हिंदुत्व नहीं रहेगा, वो तो
विश्वकुटूंब की बात करता है..
हे मत आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं. यावरून हे पुन्हा एकदा अधोरेखीत झालं
की मुसलमानांना सोबत घेतल्याशिवाय या देशाची प्रगती म्हणावी तशी होणार नाही.
मुसलमानच नव्हे या ठिकाणी अन्य कोणतीही जमात असती तरीही हेच विधान लागू होते. कारण
एखाद्या समुदायाला डावलून कुठलीच व्यवस्था व्यवस्थित चालू शकत नाही. आणि तो
समुदायही कुठलीही समांतर व्यवस्था चालवू शकत नाही जरी तसे प्रयत्न होत असतील तरीही,
हीच भारतीय लोकशाहीची खासियत आहे. आणि
म्हणूनच संघाच्या या विधानाला इथं महत्व प्राप्त होतंय. दुसरी महत्वाची गोष्ट
म्हणजे हे मत केवळ सरसंघचालकांचं नाही तर ते संपूर्ण संघ परिवाराचं आहे हे आवर्जून
लक्षात घ्यावं. जे लोक संघाला संविधान न माननारं, कट्टर हिंदुत्ववादी संघटन, भटाळे,
बामणी आणि अन्य प्रकारची स्वत:च्या संस्कृती आणि संस्कारांना अनुरूप विशेषणं लावतात त्या लोकांच्या थोबाडात
ही एक चपराक आहे.
बरेच लोक माझ्यासोबत बोलताना सहज बोलून जातात की तू संघ विचारांना कसं काय
मानतो ते तर हिंदुत्वाला मानतात. यात बरेच स्वयंसेवकही होते तो भाग निराळा. पण
त्या प्रश्नाचं उत्तर हे कालच्या संघाच्या
या मतामध्ये आहे असं मी मानतो. प्रश्न संघ विचारांना मानण्याचा नसतो. त्याला
समजण्याचा असतो. मानणारा हा स्वयंसेवक असतो मी स्वयंसेवक नाही पण चिकित्सक जरूर
आहे. मी संघाच्या काही प्रमाणात का होईना पण अंतरंगात जाऊन संघ पाहिलाय. मी संघात
असेही लोक पाहिले की ते मुसलमानांचा विरोध करतात परंतु हा टक्का अगदीच नगण्य आहे.
त्यापेक्षा प्रेम आणि आपुलकीनं जवळ करणारा वर्ग संघामध्ये जास्त आहे. अशी बरीच उदाहरण
आहेत ती पुढच्या वेळेस मांडता येतील...
काल भारिप पक्षाच्या एका प्रकाश आंबेडकर नावाच्या नेत्यानं असंबध्द बडबड करत
काहीतरी आरोप लावले. दोन तीन वेळा ती पत्रकार परिषद मी नीट ऐकली परंतू त्याचा आणि
या वक्तव्याचा कुठंही संबंध लागत नव्हता.
याच भारिपच्या माहितीसाठी संघाचं अजून एक स्टेटमेंट आहे ते म्हणजे- इस देश
में केवल वेद नहीं चलेंगे तो बौध्दमत भी चलेगा, बौध्दमत के बीना हिंदुत्व-हिंदुत्व
नहीं रहेगा. किसीके खान पान या रहन सहन पर संघ को कोई आपत्ती नहीं है।
हे संघाचं मत काही आत्ता परिवर्तीत वगैरे झालंय असं काही नाहीये. आपण ते कधीच
ऐकलं नव्हतं, आपण कधीच संघाच्या अंतरात जाऊन अभ्यास करण्याचा प्रयत्न केला नाही,
आपण कधीच बंच ऑफ थॉटसच्या पुढे जाऊन विचार केला नाही, आपण कधीच कुठल्या
स्वयंसेवकाशी संवाद साधला नाही, आपण संघाच्या कुठल्याच प्रकल्पावर जाऊन अनुभव
घेतला नाही, आपण कधीच एखाद्या प्रचारकासोबत मनमोकळ्या गप्पा मारल्या नाहीत...
इथे या देशात असेही विद्यार्थी नेते आहेत जे म्हणतात की संघ केवळ गरीबांना
गरीब ठेऊ इच्छितो, संघ गरिबांना शिक्षण देण्याच्या विरोधात आहे, वनवासींचा विकास
होऊ नये अशी संघाची इच्छा आहे त्यांनी खरंतर संघाचे देशभरात चालणाऱ्या १ लाख सत्तर
हजारांपैकी केवळ एका जरी प्रकल्पाला, उपक्रमाला भेट दिली तर कळेल की संघाचा विचार
किती व्यापक आहे. इथे लोक डायरेक्ट हिटलरशी तुलना करतात, त्यासाठी त्यांना प्रेस
क्लबमध्ये एका टेबलाची आणि खुर्चीची व्यवस्था करून दिलेली असते केवळ हेच तुणतुणं
वाजवायचं असेही निर्देश त्यांना असतात. अशा लोकांसाठी संघाचं दुसरं स्टेटमेंट आहे
की,
आम्ही तुम्हाला कन्वीन्स करणार नाही कधी केलंही नाही आणि पुढेही करणार नाही.
कन्वीन्स व्हायचं किंवा नाही हा तुमचा प्रश्न आहे. आम्ही फक्त संघ काय आहे ते
मांडणार त्यामुळे कुणी निषेध केला काय आणि स्तुती केली काय त्याचा संघावर काही
परिणाम होत नाही.
भारतातला मुसलमान अजूनही इथल्या मातीशी इमान राखून आहे. याच पुरातन संस्कृतीत
तो जन्मला, इथेच वाढला, इथेच मरेल याच मातीत तो मिसळूनही जाईल. बेशक त्याची
श्रध्दा आणि उपासना पध्दती वेगळी असेल तसा त्याला अधिकारही आहे. जे भरकटलेत त्यांना
आमच्यासारखे मुसलमान देशहितासाठी सरळ मार्गावर आणतील. हे मात्र नक्की.
Wow!. Very apt analysis. RSS never considered Indian of other faiths as aliens. They are our own people.
ReplyDeleteThanks
ReplyDeleteAaysa he to fir rss ke log etna Muslim vrodhi vichar q failate he.. gay ke nam pr garib Muslim dalitoki hatya ki jati he.. Or rss संविधान मानता हे तो बाबा सहाब के संविधान पर चलने वाला हमे भारत हि चाहिये. जो दलित मुस्लिम हिंदु शिख को साथ लेकर चलता हे
ReplyDeleteसभी बाबासाहब के ही संवैधानिक मार्गपर चलते हैं. फिर वो संघ हो या और कोई. रही बात दलित और मुस्लिम को मारने की तो यह संशोधन का विषय है. संघ को बदनाम करने के लिए संघ का चोला पहने हुए कई लोग जो अपने आप को हिंदु कहलाते हैं वो लोग मुसलमानों का मारने का काम करते हैं. फिर कुछ हादसे छोड दिए तो सबसे ज्यादा दंगे और सबसे ज्यादा मुसलमान कांग्रेस के राज में हुए हैं इस पर कोई रिसर्च करेगा क्या? यहां तक की देश का बटवारा होने में भी कांग्रेस का हाथ ही हाथ है, इसपर कोई नहीं बोलेगा. स्वर्ण मंदीर में लाखो सिख्खों को काटा गया उसका गुनहगार कौन है यह भी सोचना पडेगा. दंगो और अत्याचार यह एक रिसर्च का विषय है आप जो देखतें है अक्सर वो वैसा नहीं होता. इसलिए इस विषय पर विस्तार से चर्चा होना अपेक्षित है..
Delete