मंदीर बनायेगा
कौन?
काल म्हणजेच
दसऱ्याच्या दिवशी बऱ्याच सभा आणि कार्यक्रम गाजले. त्यातले दोन कार्यक्रम म्हणजे एक नागपूरचा
संघाचा कार्यक्रम आणि दुसरा म्हणजे मुंबईतला शिवसेनेचा दसरा मेळावा. संघाची भूमिका
ही नेहमीच राम मंदीराच्या बाजूने राहीली आहे, नव्हे राम मंदीर उभं करण्यासाठी जे
काही प्रयत्न करायचे ते प्रयत्न संघाच्या वतीनं केले जातायत, मात्र कालच्या
कार्यक्रमात सरसंघचालकांनी पुन्हा राम मंदीराचा मुद्दा उपस्थित केला. तसंच
शिवसेनेचा संपूर्ण मेळावा जरी विनोदी असला
तरी उध्दव ठाकरेंची २५ नोव्हेंबरला अयोध्येला जाणार असल्याची डराकाळी मात्र गंभीर
आहे. अशातच काही दिवसांपूर्वी बाबराच्या कोण्या वंशजानं मंदीर बांधण्यासाठी न
मागताच परवानगी दिल्याचंही कानावर आलं. शिय़ा समुदायाही राम मंदीराच्या बाजूने आहे
म्हणे. आज काँग्रेसवालेही म्हणत होते की आम्हीच पहिल्यांदा टाळे तोडले. ढाँचा
पाडताना आमचंच सरकार होतं. विश्व हिंदू परिषदेनं राम मंदीरासाठी हे आंदोलन खऱ्या
अर्थानं सुरू केलं होतं परंतू आज विश्व हिंदू परिषद गायब आहे. भाजपचा तर अजेंडाच
राम मंदीर आहे निवडणुकींपुरता का असेना पण आहे.
वरील सर्वांची मतं, वक्तव्य आणि कृती ह्या त्यांच्या त्यांच्या भविष्याच्या
दृष्टीनं फार महत्वाच्या आहेत. याचं कारण म्हणजे २९ ऑक्टोबर पासून सुप्रिम कोर्ट
राम जन्मभूमी आणि बाबरी ढाँचा प्रकरणावर रोज सुनवाई करणार आहे. त्या जागेवर राम
मंदीर होतं हे जवळपास सिध्द होत आलंय. २०१० साली अलाहाबाद हायकोर्टाच्या लखनौ खंडीपीठानं
दिलेल्या निकालाप्रमाणे रामाची मूर्ती जिथे आहे तिथेच राहील बाकी जमीन तीन समान
भाग केले जातील ज्यामध्ये राम मंदीरासाठी एक, निर्मोही आखाड्यासाठी एक आणि सुन्नी
वक्फ बोर्डासाठी एक असा निर्णय न्यायालयानं दिला नंतर ह्या निर्णयाला स्थिगिती
देण्यात आली तो भाग वेगळा. याचाय अर्थ भारतातल्या बहुसंख्य समुदायाच्या भावना आणि
एकूणच जागेची सद्यस्थिती पाहाता निकाल राम मंदीराच्या बाजूने लागण्याची शक्यता
नाकारता येत नाही. भारतातला बऱ्यापैकी मुसलमान देखील बाबराच्या एकूणच कृत्यांना
समर्थन देण्यापासून नेहमीच लांब राहिलाय. त्यामुळे बाबरी मस्जिद स्वाभीमानाचा विषय
वाटत नाही कारण बाबरी मस्जिद हे त्यांचं तिर्थक्षेत्र नव्हे. मक्का आणि मदीना हेच त्यांचं
एकमेव तिर्थक्षेत्र आहे आणि ते त्याची
कुणाशीही बरोबरी करणार नाहीत. ते मस्जीद कुठेही बांधू शकततात हे त्यांना माहीतीय.
परंतू जर मुस्लिमेतरांचा आयोध्या आणि राम मंदीर हा जर आस्थेचा विषय असेल तर ते आपण
त्यांना खुशाल बांधू देण्याच्या भूमिकेत असल्याचं लक्षात येतंय, काही जणांना तर
याच्याही काहीच घेणं देणं नाहीये ते बरे आणि त्यांचा मोहल्ला आणि त्यांच्या
मोहल्यातील मस्जीद बरी. काही मुसलमानांच्या आडमुठेपणामुळे कित्येकांनी आत्तापर्यंत पोळ्या
भाजल्या आणि ते मोठेही झाले परंतू हे देखील मुसलमानांच्य आता लक्षात आलंय. केवळ
सुन्नी वक्फ बोर्डाला त्यातली काही जागा मिळण्याची आशा आहे म्हणून ते लढतायत एवढंच
फक्त लक्षात ठेवावं.
त्यामुळे वरती जी काही परिस्थिती वर्णीली
आहे त्याप्रमाणे राम मंदीर बनेल परंतू त्याला बनवणार कोण? त्याचं उत्तर असं आहे की जर ही सुनवाई
रोजच्या रोज घेतली जाईल. शक्यता आहे की काही महिन्यातच निकाल लागेल. आणि असेही
उध्दव ठाकरे २५ नोव्हेंबरला अयोध्येला जाणार आहेत ते जाऊन आले की निकाल लागेल आणि
मग रामदास कदमांसारखे सेनेचे नेते म्हणतील की उध्दवजी जाऊन आले म्हणून कोर्टाला
राम मंदीराच्या बाजूने निकाल द्यावा लागला.नसता दिला तर ते अयोध्येच्या रस्त्यांवर
उतरले असते वगैरे वगैरे. भाजपचं सरकार आहे म्हणून भाजप म्हणेल आमच्यामुळे झालं.
व्हीएचपी सुरूवातीपासूनच या विषयात आहे त्यामुळे तेही म्हणतील आमच्या मुळेच झालं.
उरलेली काँग्रेस आणि तत्सम पक्ष, संघटानाही श्रेय लाटण्यासाठी पुढे सरसावतील.
त्यामुळे एक प्रश्न उरतो तो म्हणजे मंदीर तो वहीं बनायेंगे ठिकेय मगर मंदीर
बनायेगा कौन?
शेवटी एकच शक्यता राहून राहून वाटते ती म्हणजे
या सगळ्या गोंधळात मंदीराचं भूमीपूजन त्या
बाबर वंशजाच्या हस्ते होतं की काय.
अहमद शेख
९९८७४७९२१३
No comments:
Post a Comment