अभी तो मासूम था…
लंबी नाक, घुंगराले बाल
आँखों में चमक , चेहरे पे नूर था। … अभी तो वो मासूम था..
कोवळया जीवाची आणखी काय व्याख्या करावी, आणि अशा कोवळ्या जीवाला त्याच्या डोक्यात, डोळ्यात ,छातीमध्ये जर संगिनी घुसवून गोळ्या घालून क्रूरपणे कोणताही अपराध नसताना मारले जावे तर अशा हैवानियत ची काय व्याख्या करावी… प्रथम मी त्या कोवळ्या जीवांना श्रद्धांजली अर्पू इच्छितो.
काय लिहावे हा प्रश्न हि घटना घडल्या पासून मला पडला होता, नक्की कशावर लिहू ? त्या लहान मुलांच्या अवस्थेवर लिहू कि पाकिस्तानी प्रशासन व्यवस्थेवर काही लिहू किंबहुना पाकिस्ताननेच सर्परूपी पाळलेल्या अशा दहशतवादी संघटने आणि संस्थेवर लिहू, का मग त्याच्या पलीकडे जाऊन आणखी काहीतरी …
पाकिस्तान असो किंवा असे कोणतेही इस्लामिक राष्ट्र तिथे घडलेल्या घटनांचा थेट परीणाम आज जगावर किंवा जागतिक राजकारणावर होताना दिसतो. मग या जागतिकीकरणातून भारतही हि कधी सुटलेला नाही किंबहुना भारत अशा घडामोडी मध्ये निर्णायक भूमिकाहि सांगू शकतो जे कि इतिहासामध्ये सर्वश्रुत आहे . भारतामध्ये मुस्लिम असुरक्षित आहेत असा नेहमी कांगावा करणारे परवेज मुशर्रफ सारखे संधी साधू पाकिस्तानी तसेच भारतीय समाजवादी काय विचार करतायत हे देखील पुढे येणं गरजेचं आहे, फाशीच्या शिक्षेची बंदी उठवून पाकिस्तानने दहशतवादी कैद्यांना फासावर चढवायला सुरुवात केलीय मग, कसाब चा पुळका येणाऱ्या आमुक आमुक लेखिका, पत्रकार याचं काय मत आहे ते हि समोर आलं पाहिजे किंवा अशा हरामखोरांना न्यायसंस्थेने उत्तर द्यायला भाग पाडले पाहिजे.
मुळात भारतीय मुस्लिम प्रतिनिधींचे मत काय, (मी एम. आय. एम सारख्या पक्षाला किंवा त्यांच्या नेत्यांना भारतीय मुस्लिमाचे प्रतिनिधी मानत नाही ) भारतीय मुस्लिम याबद्दल काय विचार करतोय अशी क्रूरता कितपत मान्य आहे, जेंव्हा अरब मध्ये इस्लामच्या पूर्व लहान लहान मुलींना जिवंत दफन केले जायचे अशा प्रथेला खीळ लावण्याचं काम मुहम्मद पैगंबरांनी(स. अ. व. ) आणि इतर प्रेषितांनी केलं, त्या पार्श्व भूमीवर अशी घटना कितपत पाकिस्तानी जनतेला मानवते हा पण एक विचार आहे कारण आज ह्या घटनेचा निषेध करणार्यांची संख्या जरी जास्त असली तरी अशा कृत्याचं समर्थन करणारी जनता पाकिस्तानमध्ये आहे. तालिबान ला समर्थन म्हणजेच अशा कृत्यांना देखील समर्थन हे उघड उघड स्पष्ट आहे . पाकिस्तानची तालिबान विरोधी मोहीम, मलाला ला मिळालेलं नोबल, पाकिस्तानने अंगीकारलेली आधुनिक शिक्षण पद्धती
या सर्वांचं फळ म्हणजे ह्या लहान मुलांचा गेलेला जीव होय. मग याला आपण इस्लाम च्या मुळ विचारसरणीशी जोडू नये, आणि कोणी जोडलच तर माझ्यासारख्याला त्याचा रागही येता कामा नये कारण अशावेळी माझ्यासारखा माणूस हतबल होऊन जातो, काहीच करू शकत नाही. अशी कृत्ये करून इस्लाम ला बदनाम करणार्या मुस्लिमांची संख्या दुर्दैवाने आज जास्त आहे, जे कि मूळ विचारसरणीवर किंवा तत्वांवर आधारलेली नाही, मग बर्या वाईट चार ओळी ऐकलेल्या किंवा वाचलेल्या पंडितांना इस्लाम कसा श्रेष्ठ हे सांगण्यात माझ्यासारख्याच्या नाकी नव येणं साहजिकच.
असाही तर्क लावला जाऊ शकतो जे कि अतिशय चागली सवय आहे, तर तर्क असा होता कि तालिबान चा समूळ नायनाट करण्यासाठी पाकिस्तानला द्रोण नावाच्या मनुष्य विरहीत म्हणजेच स्वयंचलित विमानांची गरज आहे मग तालिबान किती खालच्या थराला जाऊन कृत्य करू शकतो हे अमेरिकेला दाखवून द्रोण विमाने पदरात पाडून घ्यायची आणि नंतर तालिबान्यांशी लढायचं, मग त्यासाठी आपल्याच सैन्याचा वंश संपवायचा, आता या तर्कामध्ये ज्या गोष्टी समोर आल्या त्यामुळे या तर्कावरती विश्वासही बसू शकतो. आता हा मानवी स्वभाव आहे कि त्यांना आमुक आमुक गोष्ट मिळविण्यासाठी असे कृत्य केले त्याला एखाद्या धर्माच्या तत्वांशी कसं काय जोडू शकतो, मग त्या मित्राने अशा घटनेवरती जो तर्क लावला ती तर्क बुद्धी त्याच्या धर्माने त्याला दिलेल्या शिकवणीचा भाग आहे असं होउच शकत नाही कारण त्याचा धर्म मानवतेचा आहे सकारात्मक विचार जगाला देणारा आहे, म्हणजे हा त्याच्या स्वभावाचा भाग आहे शेवटी जे काही तत्वज्ञान निर्मिले गेले ते सर्व मानवनिर्मितच आहे ( हे पण सत्य आहे कि या निर्मिती मागे ईश्वराचा वरदहस्त नक्कीच आहे .)
म्हणूनच मानव नेहमीच धर्माच्या वर जावून विचार करीत आलेला आहे, आणि अशा घटनांना धर्माच्या नावाखाली खपवत आलेला आहे, कुठलाच धर्म इतक्या खालच्या थराची शिकवण कधीच देणार नाही , धर्माचा विपर्यास करणारांची संख्या पण त्या त्या धर्मात असतेच.
सांगण्याचा मतितार्थ एवढाच कि प्रत्येक घटनेला धर्माशी किती जोडाव हे सद्सदविवेकबुद्धीने विचार करणार्या ज्यांच्यावर एकूणच सर्व समाजाची दिशा अवलंबलेली आहे, अशा महानुभवांनी याचा साकल्याने एका विशिष्ट चौकटीत न राहता विचार केला पाहिजे…
अहमद शेख
९६९९९३६५७५
No comments:
Post a Comment