बैठकीचे शेवटचे सत्र संपले आणि ठरल्याप्रमाणे आम्ही दहा जण संदेश मेस्त्री च्या गावी जाण्यासाठी निघालो, आपापले साहित्य आवरत शाळेच्या आवारात येउन आम्ही सर्वांचे निरोप घेतले, एका टेम्पो मध्ये बसून बस थांब्यावर पोहोचलो गाडी जरा उशिरानेच आली रात्रीचे साडेसात आठ वाजले होते. जशी रत्नागिरीसाठी बस लागली तसे आम्ही लगबगीने बस मध्ये चढलो, सगळेच एकमेकांना बसण्यासाठी जागा करून देत होते. शेवटी सर्वांना जागा भेटली आणि आमचा देवरुख ते रत्नागिरी असा प्रवास सुरु झाला, रात्रीच्या अंधारात कोकणचो सौंदर्य दिसणं जरा कठीणच होतं, जितकी गडद वनराई तितकाच गडद अंधारही. मी डोळे बंद करून निपचित पडलो.
दिवसभर बैठक तशी छान रंगली ' अभाविप प्रदेश कार्यकारिणी बैठक होती ती, येणाऱ्या काळात विद्यार्थ्यांसाठी करावयाचे कार्यक्रम, आंदोलने, सामाजिक प्रश्न यांवरती गांभीर्याने चर्चा झाली, महाविद्यालयीन निवडणुका त्यामधील विद्यार्थ्यांचा सहभाग, राजकीय पक्ष, प्राध्यापकांची भूमिका, येणारा खर्च अशा मुद्यांवर बैठकीमध्ये गहन चर्चा केली गेली, सर्व जिल्ह्यांनी आपापल्या ठिकाणी केलेल्या कार्यक्रमांची प्रदर्शनी बनवून आणली होती, आम्ही पण मुंबईची प्रदर्शनी घेऊन गेलो होतो अतिशय सुंदर आणि उठून दिसत होती ती, सटीक आणि नेमकेपणा जाणवत होता तिच्यामध्ये, झालेल्या कार्यक्रमांचे नेमके दर्शन तिच्यातून घडत होते, तशी ती व्यवस्थितच बनवली गेली होती पण … माझ्या कानावर आवाज पडला ' चला रत्नागिरी रत्नागिरी ' मी डोळे उघडले झोपलेल्या सर्वांना उठवले आपापले साहित्य घेऊन आम्ही पटापट सगळे खाली उतरलो सर्वजण उतरले याची खात्री करून आम्ही स्टेशन कडे निघालो, रात्रीचे साडेदहा वाजले होते सगळ्यांना जाम भूक लागली होती. चालता चालता एका छोट्याशा हॉटेलमध्ये जेमतेम पैशांतून जेमतेम पैसे काढत जेमतेम जेवण करून आम्ही स्टेशन वर पोहोचलो. पोहोचल्यावर कळले कि गाडी मध्यरात्री साडेतीन वाजता आहे, मग काय आपापल्या कडे असणाऱ्या वर्तमान पत्र, कार्ड शिट, फ्लेक्स इ. चा सुंदर बिछाना करून मेस्त्रीला शिव्या देत सर्वजण झोपी गेले, तीन वाजता परत मेस्त्री चा आवाज कानावर पडला तसे सर्वजण उठले आणि गाडीची वाट पाहू लागले. गाडी स्टेशन वर येताच धावत्या गाडीत चढण्याचा माझा प्रयत्न यशस्वी झाला. परंतु जागा काही भेटली नाही दोन तासांचा तर प्रवास म्हणून काही जण दरवाज्यामध्ये तर काही जन मिळेल तिथे अडजस्ट होऊन गेले, मला झोप आवरत नव्हती, समान ठेवण्याचा रैक थोडा रिकामा होता सर्वांच्या परवानगीने मी त्याच्यावर आडवा झालो आणि परत मेस्त्रीचा आवाज कानावर पडला ' चला स्टेशन आले, उतरा लवकर ,' मी उडी मारली . कणकवली नावाचे हे नावाजलेले स्टेशन होते तिथून आम्ही बाहेर पडलो, बराच वेळ चालत राहिलो तो आमच्यातला एकजण बोललाच, 'मी बोललो होतो या संद्याच काही खरं नाही, हा अजून दोन तास चालवणार ' सगळ्यांचा कटाक्ष त्याच्यावर पडला तसा तो शांत झाला , पहाटेचे पाच वाजले होते, आम्ही एका बस डेपोजवळ पोहोचलो तिथे काही खाजगी वाहने सुद्धा उभी होती बस ला उशीर लागणार म्हणून आम्ही दहा सीटर टमटम मधून प्रवास करण्याच ठरवलं, थोडी थंडी जाणवत होती मी हाफ स्वेटर घातला होता तसं प्रत्येकाने थंडीपासून वाचण्यासाठी काही ना काही बंदोबस्त केलेला होता, रोहीतकडे सुंदर अशी शाल होती तो स्वतःच्या अंगावर कमी आणि इतरांच्या अंगावर जास्त पांघरायचा. टमटम सुरु झाले आचरा- मुणगे या संदेशच्या गावी आम्ही निघालो.
कार्यसिद्धी, कार्यवृद्धी, संघटन , कार्यक्रम , आंदोलन या विषयावर चर्चा रंगली होती. वळणा वळणातून, घाटातून आमची गाडी चालली होती , एका उताराला गाडी लागली समोर तांबडं फुटलेल्या सूर्याची लाली दिसत होती, आणि माझ्या कानात ' यारा सिली सिली विरह कि रात का जलना ' या गीताचे सूर घुमू लागले, आणि खरचं विरहाची रात्र टळून सृष्टीचा अद्भुत, सुंदर, सोनेरी किरणांनी न्हाऊन निघालेला, देवाजीच्या स्वर्गा मधला हिरवा गालीच्या पांघरलेला हा शामियाना समोर दिसत होता. वेगाने धावणाऱ्या आमच्या टमटम सोबत रस्त्याच्या कडेची हिरवाई पण धावण्याचा प्रयत्न करत होती, जणू काही शेवटची लोकल पकडून तिला तिच्या किलबिलत्या बाळांकडे पोहोचण्याची आतुरता आहे. तसे आम्ही निसर्गासाठी लहान बाळेच . गीताचे सूर अचानक बंद पडले, छे साला हेडफोन कोणीतरी ओढला कानातला.
अर्धा तास झाला गाव काय येईना परत संद्याला शिव्या आणि परत हशा, दहा जणाच्या वेगवेगळ्या विनोदांनी आमचा चालक पण हसायचा आणि कधी कधी त्याचावारही विनोद व्हायचा. तास दीड तासाच्या प्रवासानंतर आम्ही मुणगे या गावी पोहोचलो आणि तिथून आतमध्ये अजून पाच सहा किलोमीटर, या दरम्यान रोहित आणि मला गाडीला चढणाच्या ठिकाणी ढकलावे लागले. तब्बल दीड तासांच्या प्रवासानंतर आम्ही संदेशच्या वाडीवर पोहोचलो. दहा बारा घरांची हि वाडी डोंगरउतारावर माडांच्या बनात वसलेली.
टमटम मधून हातपाय झटकत सर्वजण खाली उतरले, टमटम वाल्याने ठरलेल्या भाड्यापेक्षा शंभर रुपये जास्तीचे घेतले कारण त्यालाही कल्पना नव्हती कि इतक्या लांबचा हा प्रवास होईल. रोहितने गळ्यातली शाल काढली आणि टमटम चालकाच्या गळ्यात घातली आणि त्याचे सुरक्षित प्रवास घडवल्याबद्दल आभार मानले.संदेशच्या वाडीतल्या घरात आम्ही पोहोचलो प्रशस्त असा कौलारू वाडा होता तो घरासमोरच्या छोट्या खोलीतून चालत पुढे गेलो समोर मोठा हॉल उजव्या आणि डाव्या बाजूला तीन तीन खोल्या त्या देवघर , स्वयंपाक घर आणि इतर व्यवस्थेसाठी विभागल्या गेलेल्या . चालत चालत मागच्या बाजूला बाहेर पडलो सुंदर सारवलेलं अंगण उंचच्या उंच माडांचे वृक्ष, प्रशस्त मैदान मध्ये एक चूल होती त्याच्यावर पाण्याने भरलेला मोठा हंडा ठेवला होता चूल ढणा ढणा जळत होती , समोरच गोवऱ्या , वळलेली लाकडे , माडांच्या वाळलेल्या फांद्या इ. व्यवस्थित पणे रचून ठेवलेल्या होत्या. आम्ही येणार म्हणून संदेशच्या आईंनी गरम पाण्याची व्यवस्था केलेली होती. चुलीच्या समोरच एक आंघोळीची खोली आणि एक शौचालय होते, त्याला पाहताच सर्वांची त्याच्यामध्ये जाण्याची इच्छा साहजिकच होती परंतु शौचालयाचा दरवाजा अतिशय मजेशीर होता आतमध्ये माणूस गेला कि दोन मिनिटांनी तो आपोआप उघडायचा, म्हणजे ऐन भरात. आणि अशा परिस्थितीमध्ये अनिकेत आतमध्ये घुसलेला, आता दरवाजा लागला तरी तो आम्ही उघडत असू. तीन चार वेळा असे घडले पण त्या बिचाऱ्याला त्याचे कार्य सिद्धीस नेऊ दिले नाही. आणि या घटनेस आम्ही आमच्या इतिहासात चौथा प्रयत्न असे नाव देऊन टाकले. मी हे सर्व बघून शेजारच्या काकूंकडे विनंती करून त्यांचे शौचालय वापरले.
शांत आणि निरागस अशा वातावरणात आमची झोप कधी उडून गेली कळलंच नाही, सर्वजण आंघोळ करून नाश्त्याला बसले आंबोळी आणि चहा असा नाश्ता मी आयुष्यात पहिल्यांदाच करत होतो. नाश्ता उरकल्यानंतर संदेश आम्हाला फिरण्यासाठी बाहेर घेऊन निघाला, अंगामध्ये अर्धी विजार आणि टी शर्ट घालण्याच्या सूचना त्याने आम्हाला दिल्या, तशी आर्धी विजार परिधान करण्याची आमची सवयच होती. आम्ही एकमेकांची खिल्ली उडवत मोठमोठ्या झाडांवरील माकडांना खिजवत एका उंच डोंगरावर पोहोचलो. तिथे मोठा असा वटवृक्ष होता त्याच्या पारंब्या खाली लोंबत होत्या त्याला पाहताच . गावाकडच्या सुरपारोम्ब्या खेळाची आठवण झाली मी लगेच हि कल्पना सर्वांना सांगितली , पश्चिम महाराष्ट्रातला माझा मित्र राजू मांडवे ला हा खेळ आधीच माहिती होता त्याने स्वतःवर राज्य घेण्याची तयारी दर्शविली. मी पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा च्या सीमेवर राहतो त्यामुळे दोन्ही विभागात मी राहतो. असो राजू काठी आणण्यासाठी पळाला तसा मी सरसर झाडावर चढलो उंच ठिकाणी जाऊन बसलो राजू काठी घेऊन आला आणि ठरल्याप्रमाणे न वागता तो संदेशला पकडण्यासाठी गेला, तशी प. महाराष्ट्रातल्या लोकांची सवयच ही. त्याने संदेशकडे धाव घेतली म्हणून मी सरसर उतरण्याचा प्रयत्न केला, हातातली वाळली फांदी हातात आणि मी जमिनीवर जोरात आपटलो मधेच असणाऱ्या वेलींनी मला सावरण्याचा प्रयत्न केला तरीपण भरपूर ठिकाणी खरचटले होते डाव्या पायाला मुक्का मार आणि जखमा दोन्हींची भेट लाभली होती सगळीकडे हशा पिकला हसत हसत सगळेजण माझ्याजवळ येउन माझे सांत्वन करू लागले. वडाच्या पानांनी मी जखम पुसली. आमचा खेळ अर्ध्यातच गुंडाळला आणि आमच्या इतिहासात या घटनेला सूर परोम्ब्या हे नाव भेटले.
तिथून चालत चालत आम्ही डोंगराच्या एका कड्यावर पोहोचलो तिथून निळाशार क्षितिजापर्यंत पसरलेला समुद्र आमचा थकवा गारव्यात रुपांतरीत करत होता. तिथे दोन चार फोटो काढले, दुपार झाली होती जाम भूकही लागली होती येताना पळत पळत चढलेला डोंगर आता मी काठीच्या सहायाने उतरत होतो. घरी पोहोचलो, संदेशच्या बाबांनी मस्तपैकी मच्छी आणली होती. जेवण झले सगळे आराम करू लागले चार ची वेळ झाली आणि आता आम्ही समुद्राच्या दिशेने निघालो होतो परत तोच वेश. समुद्रावर पोहोचलो अतिशय स्वच्छ आणि निर्मळ किनारा. एखाद्या कवीने जगाची रीत लिहावी आणि लिहिता लिहिता त्याच्यात सामावून जावे असा हा समुद्रकिनारा , भुऱ्या - तांबड्या रंगाची रेती, मस्ती-धिंगाणा, समुद्र लाटांचे गाणे यामध्ये आमचा वेळ अगदी हातातून रेती निसटून जावी अशा रीतीने निघून गेला . तसे रेतीशी आमच्या पैकी बरेच जण परिचित आहेत.
असो दिवस संपला आम्ही परत घरी पोहोचलो रात्री शाकाहारीं साठी काजू आणि आमच्यासाठी कोंबडी असा भोजनाचा आस्वाद . रात्री पत्ते खेळण्याचा प्रयत्न केला पण जोड्या लावण्यापुढे काहीच माहित नाही आमच्या मध्ये फक्त राजूला पत्ते खेळण्याचे प्रकार माहिती परुंतु अनुभव शून्य आणि तेच बरे.
रात्री उशिरा झोपी गेलो. सकाळी लवकर उठून आवरा आवरी करू लागलो नऊ वाजताची गाडी कणकवली वरून पकडायची होती म्हणून सात वाजताच आम्ही संदेशाला सोडून नऊ जण परतीच्या प्रवासाला निघालो जाता जाता तांदळाच्या पेजेचा स्वाद आणि आईंचा आशीर्वाद घेऊन प्रवास सुरु केला.
सुंदर अनुभव या सहलीत आम्हाला आला पहिल्यांदाच आंम्ही दहा जण एकत्र अशा रीतीने एखाद्या सहली साठी आम्ही गेलो होतो राजू, शंकर, विपूल, भटू, आकाश, रोहित, संदेश, अनिकेत, योगेश आणि मी . दहा जण वेगवेगळ्या ठिकाणचे, संघटनेच्या कार्यात समर्पित होण्यासाठी मुंबईला आलो कुणी सातारा तर कुणी सोलापूर ,जळगाव ,धुळे, बीड ,मुंबई ,ठाणे इ . ठिकाणाहून आलो. आमच्यापैकी काहीजण पूर्णवेळ,काहीजण विद्यार्थी विस्तारक , निवासी विद्यार्थी अशा जबाबदाऱ्या सांभाळणारे कार्यकर्ते, नवीन नवीन नवीन विद्यार्थ्यांना संपर्कात आणून समाज आणि देश कार्यासाठी सकारात्मक भाव त्यांच्यामध्ये निर्माण करत संघटन कौशल्य पणाला लावणारे हे कार्यकर्ते जणू देशातील शेकडो अशा कार्यकर्त्यांचे प्रतीनिधीत्व या सहलीत करत होते .
त्यामुळे यांची डेस्टिनी कुणी लिहावी अथवा न लिहावी परंतु येणाऱ्या काळात अनेकांची डेस्टिनी लिहिण्याचे काम हे कार्यकर्ते करतील , म्हणून डेस्टिनी लिहिणाऱ्या कार्यकर्त्यांची सहल या नावाने आमच्या दहा जणांच्या इतिहासात या सहलीला स्थान नक्कीच मिळेल, यात काही शंका नाही

mast
ReplyDeleteखूप सुंदर...
ReplyDeleteसगळ्या आठवणी ताज्या झाल्या। धन्यवाद अहमद आज 3 वर्षांअन्तर वाचल्यावरहि सगळं जसच्या तसं डोळ्या समोर उभं राहीलं।
ReplyDelete