Saturday, 18 April 2015

गरज देशाची- गोष्ट विश्वासाची

     रस्त्यावरचा धुरुळा उडवत बस गावात शिरली आणि न थांबताच निघून गेली. एकही प्रवासी नसल्यामुळे हे हाल, गावाला एसटी सकाळी एक आणि संध्याकाळी एक बस्स  ! 
     असो बस जाता जाता कंडक्टर ने आतून दोन वर्तमानपत्र बाहेर भिरकावून दिले, दररोजच्या प्रमाणे सटव्या नं पळत जाऊन सगळी पानं एकत्रित करून देवळाच्या पारावर आणली, तशी चार पाच हुशार टाळकी तिथं होतीच. सगळ्यांच्या हातात एक दोन -एक दोन पानं गेली. तसं आपल्या तात्याच्या हातात पण एक पान आलं होतं. तात्या तिसरीपर्यंतच शिकलेला, अडखळत अडखळत वाचू लागला " म… स. र…  त       आ… ल… म. " आणि मध्येच ओरडला "आरं दत्ता आपल्या आलम्याचं नाव आलया पेपरामंदी  आणि इथं काय लिव्हलय बघ , पाकिस्तान चा झेंडा वंदन केला म्हणून शी " तसा दत्ता वाकून पाहू लागला… दत्ता बी. ए  पास झालेला पण बेरोजगार,  लग्न केलं  आणि शेती सांभाळतो घरची, सामाजिक भान असलेला आणि हुशारही… दत्ता बघता बघता बोलला
 "आरं तात्या त्यो आपला आलम न्हाय , त्यो काश्मीर चा आतंकवादी हाय "
 "कुठला म्हणला ?"
  "आता तुला कसं सांगू  ??? आरं त्यो आपला शंभू महादेव नाही का  ऱ्हात मलिकी मदला - तिकडचा हाय त्यो "
" आरं तिकडं डोंगरात व्हय का?" "तरीच म्हणलं आपला आलम्या आपलाच झेंडा वंदन करतू …. न्हाय का ?
न्हाय तर काय येतंय त्या मास्तरड्याला, तसा इमानदार हाय बेट्या त्यो आणि त्याचा आक्का खानदान "
तोंडामध्ये उरलेले चार दात आणि पान खाऊन लालभडक झालेली जीभ दाखवत तात्या हसू लागला,
" तात्या ९ वाजून गेल्या, आज रानात जायचय का न्हाय ?? ऊन चपकायल्यावर तरास व्हईल तुला "
" हां , चल मी निघतु  म्हातारी वाट बघत आसल … ह्यो घी पेपर आन ह्या गाबड्यांच्या हातामंदी दिवू नगस … कार्टी इमान करून उडीवत्यात. बातम्यांची वज न्हाई ह्यांस्नी "
तात्याचं देशाप्रती असलेल प्रेम, गावातल्या मुसलमानांवरती असलेला विश्वास त्यांच्याबद्दलचा असलेला जिव्हाळा, त्याच्या बोलण्यातून जाणवत होता. त्याला आलेला संशय हि तितकाच वास्तविकतेच्या दाहकतेची  जाणीव करून देत होता. दत्ता त्याच्याकडे बघत विस्मय  करिक मान हलवत हलवत बोलला "व्हय व्हय"
तात्या डोकं खाजवत खाजवत निघून गेला जाता जाता समोरून येणाऱ्या आलम कडे बघून नेहमीप्रमाणे हसला. 
     हे सर्व देवळाच्या एक कोपऱ्यातून पहाणारा अवलिया तात्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पहात विचार करू लागला . कि आपण कुठपर्यंत आणि किती मसरत आलम सारख्या देशद्रोह्यांचा निषेध करत राहणार . 
आजही माझ्या देशातल्या असंख्य लोकांनाच काश्मीरच्या पहाड्या आपल्या वाटत नाहीत, किंवा त्या आपल्या असल्याच्या भावना प्रत्येक मनामनांत जाणीव पूर्वक निर्माण करण्यासाठी समाजातील देशभक्त सुजाण नागरिक  कमी पडताना दिसताहेत. गावागावातून जेंव्हा अशा राष्ट्रद्रोही कृत्यांचा निषेध होत नाही, तोपर्यंत काश्मीर असेल किंवा एकूणच भारताच्या सर्व सीमा व सीमावासीयांची मने भारतासोबत जोडली जाणे शक्य नाही तरी बऱ्याच प्रमाणात देशाबद्दल आदर व सुरक्षेच्या दृष्टीने विचार करणाऱ्या पिढीचे निर्माणही झाल्याचे दिसते परंतु त्यांना दिशा देण्याचे महत्कार्य करण्याची गरज ती परत निर्माण होतेच. जना जनाचे संघटन करावे  व त्यास राष्ट्राचरणी अर्पावे.   ते  अर्पित असतानाच त्या अनामिक संघटकांनी मात्र आपल्या शाश्वत कार्याची वाहती गंगा सतत वाहत ठेवावी, जेणेकरून या देशाच्या रक्षणासाठी सहस्त्र प्रबळ हात निर्माण होतील व  ते मसरत आलमच  काय पण कुठल्याही संकटांना आपल्या कौशल्याने सहज सामोरे जाऊन त्याला नेस्तनाबूत करतील.
     तेवढ्यात दोन गाई घेऊन हातात भाकरीचं गाठोडं घेऊन तात्या निघाला तसा, पुन्हा त्याच देवळाच्या पारावर मोहिद्दीन चाचा चुर्गाळल्याले पेपर व्यवस्थित करून काहीतरी बातमी वाचत होता. 
तात्याचा आवाज आला " काय मुहीदिन पेपर वाचतुयास व्हय रं ?" 
" हां तात्या वाचतुया रोजचीच बदनामी "
" आरं तुझं इमान हाय न्हवं या गावाशी, इथल्या मातीशी हितल्या लोकांशी ?? मग काय बी फिकर नकू करूस देव तुझं भलं करील "
आणि तात्या परत हसत हसत निघून गेला .तात्याकडे  विश्वासक नजरेने बघून मोहिद्दीन परत वर्तमान पत्र वाचू लागला. 
          मनात विचारच काहूर… अवलिया तात्याच्या पाठोपाठ चालू लागला. विचार करू लागला… 
इतक्या छोट्याश्या गावातही देशाबद्दल, देशाच्या प्रत्येक समस्येबद्दल जागरूकता निर्माण झाली होती . आणि विशेष म्हणजे व्यक्तींवरील असलेली निष्ठा हि तशीच पूर्वीप्रमाणे अखंड होती मग तो कुठल्या जातीचा व धर्माचा त्याला इथे गंध नव्हता. कदाचित हि जागरूकता प्रसार माध्यमांमुळे निर्माण झाली असेल तर हे फार मोठं फलित आपल्या देशासाठी आहे. 
     राहिली गोष्ट देशातील विद्रोही वृत्तींची तर त्याच्या विरोधात नक्कीच उभे ठाकले पाहिजे, काश्मीर मध्ये गरळ ओकणाऱ्या मसरत आलम ने त्याच्या जवळ राहणाऱ्या, गिलगिट बाल्टीस्तान मधल्या  बांधवांसाठी लढा दिला तर ईश्वर त्याला कदाचित माफ करेल, पण त्याची इच्छाच जर नरकात जायची असेल तर त्याला या देशाची-विशेष करून काश्मिरी तरुणाईच जिवंत पणे नरक दाखविल्या शिवाय राहणार नाही आणि येत्या काळात ते सिध्द हि होईल त्याविषयी  जास्त भाष्य करण्याची गरजही  नाही.
         तात्याच्या  मागे चालता चालता अचानक पायऱ्या लागल्याचे जाणवले, तो मार्बल चा जिना होता (मार्बल म्हणजे आमची निवासाची इमारत ) तात्या अचानक कुठेतरी गायब झाला होता. पायाला काहीतरी चावल्याची जाणीव झाली आणि उठून बसलो माझी मोस्किटो कॉईल संपली होती आणि पायाला डासांनी वेढलेले . व्हरांड्याच्या बाकावर झोपलेलो मी उठून बसलो . डोळे उघडण्याचा प्रयत्न निष्फळ ठरत होता. तरीही मी तसाच विचार करत होतो , या देशाला आजही तरुणाईची गरज आहे, आपली गरज आहे तेंव्हा 
                                           



  

2 comments:

  1. वाह अहमद भाई.... अप्रतिम लेख

    ReplyDelete
  2. अतिशय सुंदर..सलाम तुमच्या लेखनाला..तुमच्या विचाराणा...||

    ReplyDelete